श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नको! नागाला दूध पाजावं का? सर्पमित्रांनी दिली महत्त्वाची माहिती
- Published by:News18 Marathi
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
नागपंचमीचा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. परंतु, सापाबद्दल अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धा लोकांमध्ये असतात. याबाबत सर्पमित्र मनोज गायकवाड यांनी माहिती दिलीय.
संपूर्ण महाराष्ट्रात नागपंचमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नागदेवता ही हिंदू धर्मात पूज्यनीय मानली जाते. त्यामुळे नागपंचमीला महिला वर्ग भाऊ म्हणून नागाची पूजा करतात. प्रत्येक भागात याबाबत विविध प्रथा परंपरा आहेत. तसेच समज गैरसमजही आहेत. याबाबत छत्रपती संभाजीनगर येथील सर्पमित्र मनोज गायकवाड यांनी माहिती दिलीय.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
नागदेवतेची पूजा करण्यासोबत आजकाल नागांच्या संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. आज वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर औषधांमध्ये नागापासून प्राप्त होणाऱ्या विषाचा वापर केला जातो. नागाच्या विषातील औषधी गुणांमुळे याच्या हलक्याशा मात्रेनेही अनेक लोकांचा जीव वाचवण्यास मदत होत आहे, असेही सर्पमित्र गायकवाड यांनी सांगितले. (अपूर्वा तळणीकर)