मास्टर्स पूर्ण? मग सरकारी नोकरी मिळवण्याची हीच योग्य वेळ
ITI लिमिटेड ही भारत सरकारची आघाडीची सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असून टेलिकम्युनिकेशन, डिफेन्स, आयटी आणि नेटवर्किंग क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. कंपनीची उत्पादन केंद्रे बेंगळुरू, मनकापूर, प्रयागराज, पलक्कड आणि रायबरेली येथे आहेत. तसेच बेंगळुरूमध्ये अत्याधुनिक संशोधन आणि विकास केंद्र सध्या आहेत.
या भरती अंतर्गत प्रोजेक्ट्स, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, IS आणि IT, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर लॅब, प्रोडक्शन, HR, मार्केटिंग, फायनान्स आणि हिंदी सेल अशा विविध विभागांमध्ये उमेदवारांची निवड केली जाणार आहे. प्रोजेक्ट्स आणि टेक्निकल विभागात 51, कॉम्प्युटर लॅब आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये 57, प्रोडक्शन,मॅन्युफॅक्चरिंगमध्ये 52 तर HR तसेच इतर प्रशासकीय विभागात 49 पदे आहेत.
advertisement
या भरतीसाठी ग्रॅज्युएट, B.Tech,BE, ITI, MBA/PGDM आणि PG डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. यंग प्रोफेशनल्स टेक्निशियन आणि जनरलिस्ट पदांसाठी कमाल वयोमर्यादा 35 वर्षे आहे. अंतर्गत उमेदवारांसाठी ही मर्यादा 45 वर्षांपर्यंत आहे.
निवड झालेल्या ग्रॅज्युएट उमेदवारांना दरमहा 60,000 रुपये, टेक्निशियन आणि जनरलिस्टसाठी 35,000 रुपये तर ऑपरेटर पदासाठी 30,000 वेतन दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी itiltd.in या अधिकृत वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे
