अजितदादांच्या 'दादागिरी' प्रकरणानंतर आता माढ्यात आता अधिकाऱ्यांना मारहाण, VIDEO
ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई अंतर्गत “गट ड (वर्ग-४)” पदांच्या एकूण 211 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणार्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणार्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2025 आहे. अर्ज करण्याची तारीख 3 सप्टेंबर 2025 पासून सुरू झाली आहे. https://ggmcjjh.com/ या वेबसाईटवरून तुम्ही अर्ज करू शकता. सेंट जॉर्जेस रूग्णालय, नागरी स्वास्थ केंद्र, परिचार्या शिक्षण संस्था, शासकीय दंत महाविद्यालय, आयुष संचालनालय, पोतदार रूग्णालय, रा. आ. पोद्दार वैद्यक हॉस्पिटल अशा ठिकाणी नोकरीच्या संधी आहेत.
advertisement
एअर फोर्सच्या शाळेत नोकरभरती, मिळेल घसघशीत पगार; असा करा अर्ज
सेंट जॉर्जेस रूग्णालयात 91 पदे, वांद्राच्या नागरी स्वास्थ केंद्रात 6 पदे, परिचार्या शिक्षण संस्थेमध्ये 11 पदे, शासकीय दंत महाविद्यालय आणि रूग्णालय 21, आयुष संचालनालय 6, पोतदार रूग्णालय 45, रा. आ. पोद्दार वैद्यक हॉस्पिटल15 अशा वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीच्या संधी आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2025 असून रात्री 11 वाजून 59 मिनिटांपर्यंत अर्जदार नोकरीसाठी अर्ज करू शकतात. परीक्षा देखील ऑनलाईन पद्धतीनेच होणार अद्याप जीजीएमसी मुंबई कॉलेजने परिक्षेची तारीख जाहीर केलेली नाही. वयोमर्यादा जास्तीत जास्त 38 वर्षे असून कमीत कमी वयोमर्यादा 18 इतकी आहे. शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून निवड प्रक्रियेसाठी संगणक आधारित चाचणी होणार आहे.
कडकनाथ सोडा, बाजारात आलीये चिनी कोंबडी, 40 दिवसांत सोन्याची अंडी, शेतकरी मालामाल
15000 ते 47600 पर्यंत वेतन निवड प्रक्रिया झाल्यानंतर मिळणार आहे. पण पोतदार रूग्णालयामध्ये, तीन वर्गांमध्ये नोकर भरती केले जाणार असल्याचं पाहायला मिळत आहे. यासाठी वेतन वेगवेगळं असणार आहे, त्यासाठी तुम्हाला जाहिरातीची PDF एकदा वाचावी लागेल. अर्ज शुल्काबद्दल सांगायचं तर, खुल्या प्रवर्गासाठी 1000 रूपये अर्ज शुल्काची फी आहे. राखीव प्रवर्गामध्ये (मागास प्रवर्गाला आणि आर्थिकदृटया दुर्बल घटकांना) 900 रूपये अर्ज शुल्काची फी असणार आहे.