मंगळवारी चंदेश अकॉर्डमधील बिल्डिंग क्रमांक 27 मधील एका घरात सुमनची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. आरोपीने महिलेवर चाकूने सपासप वार केले, यातले दोन वार पोटात, एक छातीवर आणि एक मानेवर करण्यात आला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली होती.
जखमी अवस्थेमध्येच महिलेला तात्काळ गुरूकृपा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. घटनेची माहिती मिळताच मीरारोड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांसह फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आणि संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू झाली. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 25, 2026 11:26 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : मुंबईतील उच्चभ्रू सोसायटी, बिल्डिंग नंबर 27... मोलकरणीसोबत फ्लॅटमध्ये भयानक घडलं
