मुंबई-पुण्यात म्हाडाचे घर खाजगी बिल्डरच्या घरांच्या तुलनेत स्वस्त आणि सुरक्षित असतं. सरकारी योजनेतून घर मिळाल्यामुळे फसवणुकीचा धोका फार कमी असतो. तरीही काही महत्त्वाच्या गोष्टी तपासणं आवश्यक आहे. फक्त लॉटरी लागली म्हणून किंवा घाईघाईत निर्णय घेणं चुकीचं ठरू शकतं. म्हणून घर घेण्यापूर्वी खालील 5 गोष्टी नक्की तपासा:
1) फ्लोअर प्लॅन तपासा:
advertisement
फक्त घराचा आकार किंवा चौरस फूट बघून निर्णय घेऊ नका. हॉल मोठा असला तरी बेडरूम खूप लहान असेल, खिडक्या कमी असल्यास प्रकाश आणि हवा नीट मिळणार नाही. किचन आणि हॉल चुकीच्या जागी असले तरी त्रास होतो. अनेक 1BHK घरांमध्ये टॉयलेट थेट बेडरूममध्ये असतं, ज्यामुळे प्रायव्हसी टिकत नाही. हॉलजवळ किंवा कॉमन टॉयलेट असणं चांगलं. फ्लोअर प्लॅन नीट पाहणं खूप महत्त्वाचं आहे.
2) घराचे लोकेशन:
फक्त किंमत आणि घराचा आकार बघून निर्णय घेऊ नका. ऑफिस, शाळा, हॉस्पिटल, मार्केट जवळ असल्यास जीवन सोपं होतं. परिसराचा विकास घराची किंमत आणि रिसेल व्हॅल्यू वाढवतो. त्यामुळे घराचे स्थान नीट तपासून घेतलं पाहिजे.
3) साईट विजिट:
वेबसाईट किंवा कागदोपत्रीवर माहिती पाहून विश्वास ठेवू नका. प्रोजेक्टला प्रत्यक्ष भेट देऊन बांधकामाची क्वालिटी, कॉमन एरिया, लिफ्ट्स, पाणीपुरवठा आणि परिसराची परिस्थिती पाहा. घर खरेदी करण्यापूर्वी साईट विजिट करणं फार महत्वाचं आहे.
4) एक्स्ट्रा खर्च लक्षात ठेवा:
घराची जाहिरातीत दिलेली किंमत फक्त मुख्य किंमत असते. त्याशिवाय रजिस्ट्रेशन फी, स्टॅम्प ड्युटी, मेंटेनन्स, डेव्हलपमेंट चार्जेस, पार्किंग फी, क्लब हाऊस फी अशा अनेक लपलेले खर्च असतात. या खर्चांचा विचार न केल्यास बजेट बिघडतं. त्यामुळे फक्त जाहिरातीत दिसणारी किंमत पाहून घर घेऊ नका.
5) गाडी पार्किंग:
म्हाडा प्रोजेक्टमध्ये रिझर्व पार्किंग मिळत नाही. तरीही बिल्डरकडे पैसे देऊन पार्किंग मिळवता येतो का, हे आधी विचारून पाहा. कार किंवा इतर फोर व्हीलर असल्यास रिझर्व पार्किंग असलेलं प्रोजेक्ट निवडा.
घर हे फक्त चार भिंतींचं नाही, तर आयुष्यभराच्या स्वप्नांचं ठिकाण आहे. म्हणून म्हाडाचे घर घेण्यापूर्वी फ्लोअर प्लॅन, लोकेशन, साईट, एक्स्ट्रा खर्च आणि पार्किंग या गोष्टी नीट तपासा. संयमाने आणि विचार करून घेतलेलं घर तुमचं आयुष्य सुखी आणि आनंददायी बनवू शकतं.