मुंबई आयकर विभागामध्ये राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू, आंतरविद्यालयामध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू, अखिल भारतीय शाळेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय खेळ, खेळांमध्ये भाग घेणारे खेळाडू, राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित खेळाडू यांना नोकरीची संधी मिळणार आहे. तीनही पदे क्रिडा संबंधित असून वेगवेगळ्या खेळातले स्पर्धक या नोकर भरतीसाठी सहभागी होऊ शकणार आहेत. खेळाच्या पात्रतेसोबतच अर्जदार 12वी उत्तीर्णही असावा.
advertisement
स्टेनोग्राफर ग्रेड- 2 पदासाठी 12 जागा, टॅक्स असिस्टंट पदासाठी 47 जागा आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी 38 जागांसाठी नोकर भरती होणार आहे. 07 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. तर ऑनलाईन अर्ज प्रक्रियेची शेवटची तारीख 31 जानेवारी 2026 आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रियेची शेवटची तारीख आणि पेमेंट करण्याची शेवटची तारीख एकच असणार आहे. स्टेनोग्राफर ग्रेड- 2 आणि टॅक्स असिस्टंट पदासाठी 25,500 ते 81,100 पर्यंत पगार, मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी 18,000 ते 56,900 पर्यंत पगार असणार आहे.
मुंबई आयकर विभागात नवीन नियुक्त होणाऱ्या नोकरदारांना 7 व्या वेतन आयोगाप्रमाणे पगार दिला जाणार आहे. स्टेनोग्राफर ग्रेड- 2 पदासाठी 18 ते 27 वर्षे वयाची अट, टॅक्स असिस्टंट पदासाठी 18 ते 27 वर्षे वयाची अट आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी 18 ते 25 वर्षे वयाची अट असणार आहे. अनुसूचित जाती- जमाती वर्गातील उमेदवारांना वयासाठी 10 वर्षांची सूट असणार आहे. फी 200 रूपये इतके असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी एकदा जाहिरात पाहूनच अर्ज भरू शकणार आहेत.
जाहिरातीच्या PDF ची ऑनलाईन लिंक- https://drive.google.com/file/d/1Vd12R4zHtbgaPxXObqVkJmVQ9BrYmvm5/view
ऑनलाईन अर्ज करण्याची अधिकृत लिंक-
