या शस्त्रक्रियेमध्ये 3 वर्षीय अफ्साचे यकृत शरिराबाहेर काढून त्यावर उपचार करणे आणि नंतर पुन्हा शरीरामध्ये त्याचे प्रत्यारोपण करायचे, ही गोष्ट फार जोखमीच होती. ही जोखमीची शस्त्रक्रिया पूर्वी उपचार न करता येणारी मानली जात होती. पण आता पहिल्यांदाच ही बाब शक्य झाली आहे. अफ्सावर झालेली ही शस्त्रक्रिया यकृत कॅन्सर असलेल्या मुलांना नवीन आशा, नवीन संजीवनी देते. अफ्सा शेखचे आई- वडील तिला मुंबईच्या वाडिया हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. आई हसिना शेख आणि वडील सादम शेख आहेत. अफ्साच्या पोटाला सूज असल्यामुळे तिचे आई- वडील तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता, ऑन्कोलॉजिस्ट डॉ. मुदलियार यांनी तिला हेपॅटोब्लास्टोमा नावाचा आजार असल्याचे निदान झाले.
advertisement
जेव्हा अफ्साला हेपॅटोब्लास्टोमा नावाच्या आजाराचे निदान झाले त्यावेळी ती जेमतेम 2 वर्षे 4 महिन्यांची होती. अफ्साला झालेला हेपॅटोब्लास्टोमा नावाचा आजार लहान मुलांमध्ये आढळणारा सर्वात सामान्य लिव्हरच्या कॅन्सरपैकी एक आहे. "डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत असे आढळून आले की, ट्यूमर यकृताच्या आत, मध्यभागी आणि आजूबाजूच्या रक्तवाहिन्यांमध्ये गुंतलेला होता, ज्यामुळे पारंपारिक शस्त्रक्रिया अशक्य होतं," असे सॉलिड ऑर्गन ट्रान्सप्लांट आणि बालरोग शस्त्रक्रियेच्या प्रमुख डॉ. प्रज्ञा बेंद्रे म्हणाल्या. केमोथेरपीमुळे ट्यूमरचा आकार कमी झाला आणि यकृताचा छोटासा भाग वाढू शकला. कॅन्सरमुळे यकृताला रक्तपुरवठा व्यवस्थित होत नव्हता. त्यामुळे लिव्हर ट्रान्सप्लांट हा सर्वोत्तम पर्याय होता. मात्र दाता उपलब्ध नसल्याने डॉक्टरांनी Ex-situ ऑटो ट्रान्सप्लांट या दुर्मीळ पद्धतीचा वापर केला.
यकृत शरीराबाहेर 4.5 तास असताना बाळाला जिवंत ठेवण्यासाठी, डॉक्टरांच्या टीमने निरोगी यकृताचा एक छोटासा भाग वाचवला जेणेकरून ते ऑटो ट्रान्सप्लांटेशनसाठी योग्य राहील. कर्करोगाने ग्रस्त असलेल्या यकृताचा जवळजवळ 70- 80 टक्के भाग काढून टाकण्यात आला. या प्रक्रियेत ऑक्सिजनेटेड हायपोथर्मिक मशीन प्रिझर्वेशन तंत्रज्ञान वापरण्यात आलं होतं. हे मशीन शरीराबाहेर असतानाही लिव्हरला रक्तपुरवठा केला जात होता. ज्यामुळे लिव्हरचं नुकसान कमी होतं. ही पद्धत लिव्हरच्या कॅन्सरसाठी क्वचितच वापरली जात असून मुलांमध्ये प्रथमच वापरली गेली. यकृताचे वजन फक्त 500 ग्रॅम होते, ज्यामुळे त्याला हाताळणे खूप जिकरीचे होते. 16 तासांच्या या शस्त्रक्रियेमुळे अफ्साला निरोगी आयुष्य जगण्याची 70 टक्के शक्यता मिळाली आहे.
डॉक्टरांचे म्हणणे आहे की, ऑपरेशनशिवाय तिचे जगणे अशक्य होते. यकृत हा पुनर्जन्म करणारा अवयव असून कर्करोग पुन्हा होण्याची 30 टक्के शक्यता राहते. खाजगी रुग्णालयात अशा गुंतागुंतीच्या प्रक्रियेचा खर्च सुमारे 15- 20 लाख रुपये असेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. शस्त्रक्रियेनंतर एका आठवड्यात अफ्साला आयसीयू वॉर्डमधून जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं. त्यानंतर तिला घरी डिस्चार्ज मिळाला. केमोथेरपी आणि तपासण्या आवश्यक असल्या तरीही तिला या शस्त्रक्रियेमुळे नवजीवन मिळालंय.
