मुंबईजवळील नव्या टर्मिनसची सविस्तर माहिती समोर
लांब पल्ल्याच्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. जोगेश्वरी टर्मिनसवरून दररोज 12 जोड्या मेल आणि एक्सप्रेस गाड्या चालवल्या जातील. यामध्ये दिल्ली आणि उत्तर भारताकडे जाणाऱ्या गाड्यांचा समावेश असणार आहे. हा टर्मिनस अमृत भारत स्टेशन विकास योजनेअंतर्गत बांधण्यात येत आहे.
advertisement
राम मंदिर आणि जोगेश्वरी स्थानकांदरम्यान रेल्वेच्या जागेवर हे टर्मिनस उभारले जात आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठीही हा टर्मिनस सोयीचा ठरणार आहे. सध्या कव्हर शेड, प्लॅटफॉर्म, सर्व्हिस बिल्डिंग आणि स्टेशन इमारतीचे काम वेगात सुरू आहे. पुढील टप्प्यात ट्रॅक टाकण्याचे काम केले जाणार आहे.
या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे 76.84 कोटी रुपये आहे. सुरुवातीला पहिल्या टप्प्यासाठी 51 कोटींची तरतूद करण्यात आली होती,मात्र विविध कारणांमुळे खर्च वाढला आहे. हा टर्मिनस 24 डब्यांच्या गाड्या हाताळण्यास सक्षम असेल.
