प्रकाश राय असं आरोपीचं नाव आहे. त्याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे. मागील अनेक दिवसांपासून आरोपी गुजरातच्या सुरतमध्ये लपून बसला होता. त्याला अटक करून रेल्वेनं घेऊन जात असताना त्याने धावत्या रेल्वेतून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा प्रयत्न त्याच्याच जीवावर बेतला आहे. अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना रायगड जिल्ह्यातील बदलापूर ते वांगणी दरम्यान ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुळचा तेलंगणा राज्यातील हैदराबाद जवळच्या एका गावातील रहिवासी आहे. त्याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि फसवणूक असा गून्हा दाखल आहे. हा गुन्हा दाखल झाल्यावर तो फरार झाला होता. त्याचा शोध तेलंगणा पोलीस घेत होते. दरम्यान, तो गुजरातच्या सुरतमध्ये असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार तेलंगणा पोलिसांनी गुजरात राज्यातील सूरत येथून त्याला अटक केली.
अटकेनंतर आरोपी प्रकाश राय यास हैदराबाद येथे घेवून जाण्याकरिता राजकोट-सिकंदराबाद एक्सप्रेस ट्रेन मधून सुरत पासून त्यांनी प्रवासास प्रारंभ केला. ही ट्रेन सोमवारी रायगड जिल्ह्यात बदलापूर ते वांगणी दरम्यान जात असताना आरोपी प्रकाश राय याने बाथरूमला जाण्याची परवानगी तेलंगणा पोलीसांकडे मागितली. प त्यामुळे त्याच्या हातामधील हातकडी पोलीसांनी काढली. हातकडी काढताच हात धुण्याचा बहाणा मृत -आरोपी प्रकाश राय यांने धावत्या ट्रेनमधून बाहेर उडी मारली व त्यांत तो जागीच मृत झाला.
