महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. अनेक दिवसांपासून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र प्रवेशासाठी मुहूर्त मिळत नसल्याने हा प्रवेश रखडला असल्याचा सांगितलं जात होतं. परंतु आता ठाकरे गटाच्या जिल्हाअध्यक्षाला भाजपमधील प्रवेशाचा मुहूर्त गवसला असून उद्या भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, वनमंत्री गणेश नाईक आणि माजी केंद्रीयमंत्री कपिल पाटील यांच्याहस्ते प्रवेश होणार अशी चर्चा आहे. महत्त्वाचे म्हणजे या प्रवेशासाठी अमृता फडणवीस यांनी उपस्थिती राहणार आहेत अशी चर्चा सुरु झाली आहे.
advertisement
माजी नगरसेवकांचा प्रवेश होण्याची शक्यता
दीपेश म्हात्रे यांच्यासोबत तीन ते चार माजी नगरसेवकांचा प्रवेश होण्याची शक्यता आहे. दीपेश म्हात्रे हे सर्वात पहिले शिवसेनेत होते, नंतर शिंदे गट आणि मग ठाकरे गटात प्रवेश केला. म्हात्रे यांनी डोंबिवली विधानसभेतून भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. तर गेले वर्षभरापासून विविध विषय हाताळून आणि आंदोलन करून विरोधी पक्षाची भूमिका मांडत होते. जर म्हात्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर ठाकरे गटाला मोठा झटका असून ठाकरे गटाकडे स्थानिक पातळीवर पक्षाकडे मोठा नेता नाही.
भाजपचा मित्र पक्षांना देखील धक्का
तर दुसरीकडे भाजपने काही ठिकाणी आपल्या मित्र पक्षांना देखील धक्का दिला आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील काही नेत्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने महत्त्वाचा तारखा जाहीर केल्या आहे.
हे ही वाचा :
