नेमकं घडलं काय?
तक्रारदार हा आपल्या पत्नी आणि मुलांसह कुर्ला पश्चिम परिसरात राहतो. तसेच कुर्ला परिसरात त्याचा स्वतःचा व्यवसाय आहे. काही दिवसांपूर्वी त्याने सोशल मीडियावर एका महिलेशी मैत्री करण्यासंदर्भातील जाहिरात पाहिली. त्यानंतर दोघांमध्ये ऑनलाईन संवाद सुरू झाला.
हळूहळू आरोपी महिलेनं तक्रारदाराशी जवळीक वाढवली आणि त्याच्यावर प्रेम असल्याचं नाटक केलं. काही काळानंतर तिनं आपल्या वडिलांची तब्येत गंभीर असल्याचं सांगून पैशांची मागणी केली. विश्वास ठेवून तक्रारदाराने तिला पैसे पाठवले. त्यानंतर काही दिवसांनी तिनं वडिलांचं निधन झाल्याचं सांगत पुन्हा पैशांची मागणी केली.
advertisement
अशा विविध खोट्या कारणांद्वारे आरोपी महिलेनं तक्रारदाराकडून एकूण 9 लाख 85 हजार रुपये उकळले. मात्र, काही दिवसांनतर तक्रारदाराला संशय येऊ लागला आणि त्यानं पुढे पैसे देण्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या आरोपी महिलेनं त्याला खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली.
या धमकीनंतर तक्रारदाराने कुर्ला पोलिस ठाण्यात धाव घेऊन महिलेविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपी महिलेचा शोध सुरू केला आहे
