TRENDING:

Mumbai Railway : जे आधी नव्हतं ते आता मिळणार, मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी घेतला मोठा निर्णय

Last Updated:

Central Railway Passenger Facilities : मुंबई विभागातील मध्य रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी नवी सुविधा सुरु करण्यात आली आहे. नेमक्या कोणत्या सुविधा प्रवाशांना मिळणार आहेत आणि नेमका कसा फायदा होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुंबई शहरात बऱ्याच वर्षापासून लोकल ट्रेनचे जाळे विस्तारले आहे आणि दररोज लाखो संख्येने नागरिक यातून प्रवास करत असतात. मात्र, त्यातही मध्य रेल्वे हा मार्ग जास्त लोकसंख्येचा मानला जातो. त्यामुळे या मार्गावर प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर होण्यासाठी मध्य रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. नेमका हा निर्णय कोणता असेल आणि प्रवाशांना किती याचा फायदा होईल ते जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
CentralRailway
CentralRailway
advertisement

मध्य रेल्वे प्रवाशांना सोयीसाठी घेतला मोठा निर्णय

मध्य रेल्वेवरच्या प्रत्येक स्थानकांतील प्रवाशांचा प्रवास आरामदायी आणि सुरक्षित होण्यासाठी कामाला लागली आहे. ज्यात त्यांनी

ऑक्टोबर 2025 मध्ये विविध स्थानकांवर अनेक सुधारणा सुरू केल्या आहेत. ज्यामध्ये डोंबिवली स्टेशनवरील प्लॅटफॉर्म 3 आणि 4 आणि कुर्लावरील प्लॅटफॉर्म 5 आणि 6 या स्थानकांवर प्रत्येकी दोन एस्कलेटर बसवण्यात आले आहेत,ज्याचा फायदा प्रवाशांना मोठ्या प्रमाणात होत आहे.

advertisement

ऐवढेच नाही तर 92 अतिरिक्त ब्रशलेस डायरेक्ट करंट पंख्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. हे पंखे पारंपरिक मोटर्सपेक्षा कमी ऊर्जा वापरतात आणि कमी आवाज करतात आणि टिकाऊ आहेत. यामुळे उर्जेचा वापर 50 ते 70 टक्क्यांनी कमी होईल.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
एका एकरात केली काकडी लागवड, 60 दिवसांत 1 लाख कमाई,शेतकऱ्याने सांगितला फॉर्म्युला
सर्व पहा

मुंबईत रात्रीही प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे रात्रीचा प्रवासही सुरक्षित होण्यासाठी 386 एलईडी ट्यूब लाईट्स बसविण्यात आल्या आहेत तसेच उरण स्थानकावर जीपीएस घड्याळ बसवले गेले आहे, तर माटुंगा स्थानकावरील सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली IP-आधारित करून 35 स्पीकर्ससह अधिक स्पष्ट आणि सोपी माहिती दिली जाते

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Railway : जे आधी नव्हतं ते आता मिळणार, मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी घेतला मोठा निर्णय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल