TRENDING:

Electricity Bill : मुंबईत वीज स्वस्त होणार! जाणून घ्या तुमच्या बिलात किती रुपयांची घट होणार

Last Updated:

Mumbai Electricity Rates : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. लवकरच वीज दर कमी होण्याची शक्यता असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे वीज बिल कमी होणार आहे. या निर्णयामुळे लाखो ग्राहकांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : उन्हाळा सुरु होताच सर्वसामान्य नागरिकांचे महिन्याचे बजेट वाढीव वीज बिलामुळे कोलमडते. परंतू आता राज्यातील वीज ग्राहकांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे. येत्या 1 एप्रिलपासून वीज दरात कपात होणार आहे.
मुंबईकरांच्या लवकरच वीज बिलात होणार कपात
मुंबईकरांच्या लवकरच वीज बिलात होणार कपात
advertisement

मुंबईत वीज चक्क स्वस्त होणार?

अदानी तसेच महावितरण, बेस्ट, टाटा या सर्व महत्त्वाच्या वीज वितरण कंपन्या असून यांनी केलेल्या विनंतीवरुन राज्य वीज नियामक आयोगाने वीज दरात कपात केली आहे. नवीन दर हे येत्या सात दिवसानंतर अर्थात 1 एप्रिलपासून लागू होतील. घेतलेल्या या निर्णयामुळे महागाईच्या या दिवसांत सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

advertisement

कमी वीज वापरणाऱ्या मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे कारण बेस्टकडून सर्वात कमी दरात वीज पुरवठा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

1 एप्रिलपासून किती येणार वीज बिल?

1) 2025 आणि 26 या वर्षात 0 ते 100 युनिटसाठी 4. 76 रुपये दर होता तर आता 2026-27 या वर्षात हाच दर कमी होऊन तो 4.3 रुपये झालेला आहे. म्हणजेच सुमारे 9.7 टक्के कपात झालेली आहे.

advertisement

2) 101 ते 300 या युनिटसाठी सुरुवातीस 7.97 रुपये ग्राहकांना द्यावे लागते होते तर आता नवीन दर हे 7.1 रुपये असणार आहे. ज्यामध्ये साधारण 10.8 टक्के घट झालेली आहे.

3) 301 ते 500 युनिटसाठी आधी 13.55 रुपये आकारले जात होते. आता तोच दर कमी होऊन जवळपास 11.64 रुपये झाला आहे. म्हणजेच तब्बल 14 टक्के कपात झालेली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबाच्या दरात पुन्हा वाढ, कांद्याला भाव नाहीच, केळीची काय स्थिती? Video
सर्व पहा

4) ५०० पेक्षा जास्त युनिटसाठी पूर्वी ग्राहकांना 14.55 रुपये द्यावे लागत होते तर तेच दर आता 12.64 रुपये करण्यात आलेले आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
Electricity Bill : मुंबईत वीज स्वस्त होणार! जाणून घ्या तुमच्या बिलात किती रुपयांची घट होणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल