लूटलं किती बघा
मिळालेल्या माहितीनुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या तपासाच तापडियाचे एकूण वेतन उत्पन्न हे 1 कोटी 12 लाख 17 हजार रुपये इतके आहे. पण त्याने त्याच्या पत्नीच्या नावावर 1 कोटी 42 लाख रुपयांची मालमत्ता खरेदी केलेली आहे. एवढेच नाही तर त्याने तब्बल 1 कोटी 64 लाख रुपयांहून अधिक खर्च केल्याचेही समोर आलेले आहे.
advertisement
खरं पाहिले तर या सर्व रकमेचा एकत्रित विचार केला तर तापडियाने 1 कोटी 94 लाख रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जाम केल्याचे समोर आले आहे. ही रक्कम त्याच्ये पगाराच्या उत्पन्नापेक्षा तब्बल 173 टक्के जास्त आहे.
या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तपास अधिक तातडीने केला असून त्याच्या घराची झडतीही सुरू करण्यात आली आहे. पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेमुळे शासकीय कार्यालयांमध्ये महागड्या गाड्यांमधून येणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अशा कारवायांमुळे भ्रष्टाचाराविरोधात कठोर पावले उचलली जात असल्याचे स्पष्ट होत आहे.
