बई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण प्रसंग
मिळालेल्या माहितीनुसार, हा ट्रक पुण्याहून मुंबईकडे जात होता. दरम्यान आग लागल्याचे कळताच प्रसंगवधान राखत चालकाने ट्रक महामार्गावरील शेवटच्या लेंनवर आणला. त्यानंतर त्यानेही आगीतून आपली सुखरूप सुटका केली काही क्षणातच आगीने रोद्र रूप धारण केलेत्यामुळे ट्रक ची समोरील केबिन दर्शनी भाग पूर्णपणे जळून राख झाला आहे.
आगीची माहिती मिळताच देवदूत यंत्रणा त्यासोबतच महामार्गावरील क्यूआरटी टीम महामार्ग पोलीस यांनी घटनास्थळावर दाखल होत शर्थीचे प्रयत्न करून अर्ध्या तासात आग विझवली.परंतु, संबंधित घटनेवेळी अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांकडून खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईकडे जाणारी लेन पूर्णपणे थांबविण्यात आली होती त्यामुळे एक्सप्रेस वेळेवर मुंबई लेनला मोठी वाहतूक कोंडी झाली होती जवळपास चार ते पाच किलोमीटर वाहतुकीच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या ट्रकला आग नेमक्या कुठल्या कारणामुळे लागली याचा तपास महामार्ग पोलीस करत आहे
advertisement
