दहीहंडी उत्सवात उंचच उंच मानवी मनोरे बनवले जातात. त्यामध्ये अपघाताचा धोका अधिक असतो. परंतु, दहीहंडीला राज्य सरकारने साहसी खेळाचा दर्जा देत विमा संरक्षण देखील देण्याचा निर्णय घेतला आहे. जास्तीत जास्त 10 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण या योजनेतून दिलं जातंय. विशेष म्हणजे त्यासाठी 6 टप्पे करण्यात आले आहेत. गोविंदाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना 10 लाख रुपये दिले जाणार आहेत.
advertisement
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा श्री संत नामदेव महाराज पुरस्काराने सन्मान, पंढरपुरात रंगला सोहळा
यंदा 16 ऑगस्टला राज्यात दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे. त्यासाठी राज्यातील दीड लाख गोविंदांच्या विम्याचा प्रीमियम सरकार भरणार आहे. महाराष्ट्र राज्य गोविंदा असोसिएशन, मुंबई ही संस्था गोविंदांचे प्रशिक्षण, आरोग्य आणि भागीदारीसाठी नियुक्त केली आहे. गोविंदांना 6 टप्प्यात विम्याचं संरक्षण मिळेल. दहीहंडी दरम्यान मृत्यू झाल्यास गोविंदांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळेल. तसेच कायमस्वरूपी अपंगत्व, दोन्ही डोळे किंवा इतर अवयवांचं नुकसान झाल्यास 10 लाख रुपयांचंच विमा कवच असेल. तर एक डोळा, एक हात किंवा एक पाय गमावणाऱ्या गोविंदांना 5 लाख रुपये मिळतील.
दरम्यान, दहीहंडीवेळी जखमी झाल्यास 1 लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळणार आहे. गोविंदांची सुरक्षा आणि कल्याणासाठी राज्य सरकारने ही योजना आणली आहे.