TRENDING:

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन काम सुसाट, पालघरमधून मोठी अपडेट समोर, कधी धावणार?

Last Updated:

पालघर जिल्ह्यातील दुसऱ्या माउंटन टनेलचा ब्रेकथ्रू यशस्वी झाला आहे. सकाळी झालेल्या ब्लास्टिंगनंतर हे टनेल पूर्ण झाले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन हा केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात आज एक मोठा टप्पा पार पडला आहे. पालघर जिल्ह्यातील दुसऱ्या माउंटन टनेलचा ब्रेकथ्रू यशस्वी झाला आहे. सकाळी झालेल्या ब्लास्टिंगनंतर हे टनेल पूर्ण झाले. हे टनेल 454 मीटर लांब आणि 14.4 मीटर रुंद आहे, ज्यात अप आणि डाउन दोन्ही ट्रॅक्स बसवले जाणार आहेत. हे यश एका महिन्यात दुसऱ्या टनेलचे आहे. पहिला ब्रेकथ्रू 2 जानेवारीला झाला होता.
News18
News18
advertisement

2017 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे तत्कालीन पंतप्रधान शिंजो अबे यांनी मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वेचा पाया घातला. एकूण 508 किलोमीटर लांबीचा हा मार्ग भारतातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प आहे. जपानच्या जेआयसीएच्या सहकार्याने हा प्रकल्प उभारला जात असून, एकूण खर्च 1,08,000 कोटी रुपये आहे.

टाकाऊ मूर्तींपासून टिकाऊ कलाकृती, तृप्ती यांचा पर्यावरण पूरक उपक्रम, अश्या बनवतात वस्तू, Video

advertisement

 बुलेट ट्रेन कधी धावणार?

टीबीएम मशीनने बोगद्याच्या शेवटच्या टोकाचा दगड फोडला, तसे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी टाळ्या वाजवून या यशाचे स्वागत केले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या इंजिनिअर्सनी भारत माता की जयच्या घोषणा देत तिरंगा फडकवला. या प्रसंगी बोलताना अश्विनी वैष्णव यांनी मोठी घोषणा केली की, भारतातील पहिली बुलेट ट्रेन 15 ऑगस्ट 2027 रोजी धावेल.

advertisement

2 तास वाचणार

बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे मुंबई आणि अहमदाबाद दरम्यानच्या प्रवासाचा वेळ 1 तास 58 मिनिटांपर्यंत कमी होईल. यामुळे दोन्ही शहरांमध्ये थेट कनेक्टिव्हिटी मिळेल. याचा फायदा दोन्ही शहरांतील जलद वाहतूक आणि विकासासाठी होणार आहे. रस्ते वाहतुकीच्या तुलनेत बुलेट ट्रेनमुळे कार्बन उत्सर्जन 95 टक्क्यांनी कमी होईल. ज्यामुळे पर्यावरणावर सकारात्मक प्रभाव पडेल.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हळदीला उच्चांकी भाव, डाळिंब आणि आल्याला काय मिळाला दर? इथं चेक करा
सर्व पहा

बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे रोजगारनिर्मितीसाठीही मोठे योगदान दिले जात आहे आणि संपूर्ण प्रकल्पाच्या पूर्णतेनंतर भारतातील परिवहन प्रणाली मोठा टप्पा गाठणार आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन काम सुसाट, पालघरमधून मोठी अपडेट समोर, कधी धावणार?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल