TRENDING:

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी तरुणाने संपवलं जीवन; मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

Last Updated:

Maratha Reservation: मुंबईच्या वांद्रे पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलावर गळफास घेऊन या तरुणाने आत्महत्या केली आहे. यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी मुंबई, 19 ऑक्टोबर (प्रमोद पाटील, प्रतिनिधी) : मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातून मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारल्यानंतर आरक्षणाचा लढा अधिक तीव्र आणि व्यापक झाला आहे. जरांगे पाटील यांनी नुकतेच जालना येथे मराठा समाजाची अतिवाराट सभा घेतली. मराठा आरक्षणाबाबत सरकारी पातळीवर हालचाली सुरू झाल्या. मात्र अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. अशातच राजधानी मुंबईत एक दुर्दैवी घटना घडली आहे. आज जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनात सक्रिय युवक सुनील बाबुराव कावळे यांनी मुंबईत आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मराठा आरक्षणासाठी तरुणाने संपवलं जीवन
मराठा आरक्षणासाठी तरुणाने संपवलं जीवन
advertisement

हे सरकारचं पाप आहे : मनोज जरांगे पाटील

सुनिल कावळे हे मूळचे जालना जिल्ह्यातील अंबड येथील रहिवासी होते. सुनिल कावळे यांनी स्वतःचा शर्ट आणि वहीच्या पानावर आपण आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या करत असल्याचं लिहिलं आहे. मुंबईतील वांद्रे परिसरात ही घटना घडली. आत्महत्या केलेले सुनिल कावळे हे जालन्याहून एकटेच मुबंईत आले होते. दरम्यान आत्महत्येपूर्वी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना पत्र लिहिलं आहे. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे पाटील, म्हणाले की हे सरकारचं पाप आहे, सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. आमचा माणूस गेला आहे, तो परत येणार नाही. सरकारला हे परवडणार नाही, आम्ही बलिदान वाया जाऊ देणार नाही. सरकारने तातडीने आरक्षण दिलं पाहिजे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

advertisement

वाचा - रोहित पवार यांना मुंबई हायकोर्टाकडून मोठा दिलासा, 'ती' नोटीस अखेर रद्द

मृत्यूपूर्वी चिठ्ठीत काय लिहिलंय?

मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यातील अंबड तालुक्यातील या तरुणाने स्वतःचा शर्ट आणि वहीच्या पानावर आपण आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या करत असल्याचं लिहिलं आहे. मुंबईतील वांद्रे परिसरात ही घटना घडली. आत्महत्या केलेला तरुण जालन्याहून एकटाच मुबंईत आला होता. दरम्यान आत्महत्येपूर्वी त्याने मनोज जरांगे पाटील यांना पत्र लिहिलं आहे. या घटनेची नोंद पोलीस स्थानकात झाली असून वांद्रे पोलिसांकडून तपास सुरू आहे. दरम्यान मनोज जरांगे यांचा दोन दिवस पुणे दौरा आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत त्यांची सभा होणार आहे. राज्य सरकारला जरांगे यांनी दिलेली मुदत 24 ऑक्टोबरला संपत असताना हा त्यांचा दौरा सरकारच्या अडचणी वाढवणारा ठरणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी तरुणाने संपवलं जीवन; मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल