TRENDING:

Mhada Lottery : मुंबईत हक्काचं घर हवंय? म्हाडाकडून 2640 घरांची लॉटरी, कसा कराल अर्ज?

Last Updated:

मुंबईत घर घेणं दिवसेंदिवस कठीण होत असताना सर्वसामान्यांसाठी म्हाडाकडून दिलासादायक निर्णय समोर आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुंबईत घर घेणं दिवसेंदिवस कठीण होत असताना सर्वसामान्यांसाठी म्हाडाकडून दिलासादायक निर्णय समोर आला आहे. वाढत्या घरांच्या किंमतीमुळे अनेकांनी स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पुढे ढकललं होतं. मात्र आता म्हाडाच्या नव्या सोडतीमुळे हे स्वप्न साकार होण्याची नवी आशा निर्माण झाली आहे.
मुंबईत घर हवंय? म्हाडाची लॉटरी ठरणार गेमचेंजर; 2640 घरांची संधी, आजपासून अर्ज प्
मुंबईत घर हवंय? म्हाडाची लॉटरी ठरणार गेमचेंजर; 2640 घरांची संधी, आजपासून अर्ज प्
advertisement

2640 घरांची मोठी सोडत जाहीर

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळातर्फे विविध उत्पन्न गटांसाठी 2640 सदनिकांची सोडत जाहीर करण्यात आली आहे. या सोडतीत मुंबईतील विक्रोळी, गोरेगाव, बोरीवली, चेंबूर, वांद्रे, घाटकोपर, गिरगाव, वडाळा, पवई, माझगाव, दादर आदी महत्त्वाच्या भागांतील घरांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील वेगवेगळ्या परिसरांमध्ये घर घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

advertisement

अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू

या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 30 मार्च 2026 रोजी दुपारी 3 वाजल्यापासून सुरू होणार आहे. अर्ज करण्यासाठी इच्छुकांना अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 29 एप्रिल 2026 रात्री 11.59 वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे, तर अनामत रक्कम भरण्याची मुदत 30 एप्रिल 2026 पर्यंत असेल. यानंतर 5 मे रोजी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी जाहीर केली जाईल. या यादीवर हरकती किंवा दावे सादर करण्यासाठी 8 मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

advertisement

अंतिम यादी 12 मे रोजी प्रसिद्ध केली जाईल आणि प्रत्यक्ष सोडत 15 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता काढण्यात येणार आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते या प्रक्रियेचा शुभारंभ होणार असून अर्जासाठी ऑनलाइन लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: कृषी मार्केटनं वाढवलं टेन्शन; द्राक्षे, केळीची आवक घटली, कांदा अन् लिंबूला किती मिळाला भाव?
सर्व पहा

दरम्यान, मुंबईत स्वतःचं घर घेण्याची वाट पाहणाऱ्या नागरिकांसाठी ही सोडत महत्त्वाची संधी मानली जात आहे. त्यामुळे इच्छुकांनी वेळेत अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mhada Lottery : मुंबईत हक्काचं घर हवंय? म्हाडाकडून 2640 घरांची लॉटरी, कसा कराल अर्ज?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल