मुंबई : मुंबईमध्ये स्वतःच्या हक्काचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. या स्वप्नाला पुर्णत्वास नेण्यासाठी म्हाडाने गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईतील मध्यम वर्गगियांसाठी कमी दरात घरांच्या लॉटरी काढल्या आहेत. त्यामुळे म्हाडामध्ये घर मिळावे म्हणून प्रत्येकजण म्हाडाच्या लॉटरीसाठी आपले नशीब आजमावत असतो.
यंदाच्या वर्षीदेखील अनेक नागरिकांनी म्हाडाचा फॉर्म भरला होता. पण वेळेची कमतरता होती. याच पार्श्वभूमीवर म्हाडाच्या अर्ज भरण्याच्या तारखा वाढवण्यात आल्या आहेत. आधी 8 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर अशी मुदत देण्यात आली होती. मात्र, आता 19 सप्टेंबरपर्यंत ही मुदत वाढवण्यात आली आहे. तर घरांच्या किंमतीमध्येही घट करण्यात आली आहे.
advertisement
म्हाडाच्या अधिकारी यांनी लोकल18 शी बोलताना सांगितले की, या आधी फक्त एक महिन्यापेक्षा कमी कालावधी दिला होता. मात्र, तो कालावधी आता पंधरा दिवस वाढवण्यात आला आहे. यंदाच्या वर्षी तारीख वाढवल्याने लोकांचा आम्हाला दुप्पट प्रतिसाद लाभला आहे. तसेच लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे लोकांनी फॉर्म भरण्यास सुरुवात केली आहे.
महिलांसाठी चांगली संधी, छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वस्तात मिळतायेत पारंपारिक मोत्याची दागिने, VIDEO
म्हाडाच्या लॉटरीमध्ये चार प्रकार आहेत. अत्यल्प उत्पन्न गट (ईडब्ल्यूएस), अल्प उत्पन्न गट (एलआयजी) मध्यम उत्पन्न गट (एमआयजी) आणि उच्च उत्पन्न गट (एचआयजी) असे हे 4 प्रकार आहेत. तुम्ही कोणत्या गटात अर्ज करु शकता हे तुमच्या उत्पन्नाच्या दाखल्यावर अवलंबून असते. जर तुम्हाला मुंबईमध्ये स्वतःच्या हक्काचे घर हवे आहे तर म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करून तुम्ही हक्काच्या घरासाठी प्रयत्न करू शकता.
ही सर्व प्रक्रिया ऑनलाईनच पार पडेल. त्यामुळे आता म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करायचा असेल, शेवटची तारीख 19 सप्टेंबर आहे. तसेच म्हाडाच्या घरांची लॉटरी सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला काढण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.