TRENDING:

'सरकार किती चुकीच्या...' राज ठाकरेंचा मनसेसैनिकांना वर्धापन दिनी नवा आदेश, पोस्टमध्ये म्हणाले...

Last Updated:

तुमच्यासकट जे जे नव्याने आपल्यासोबत जोडले जाणार आहेत, ते आपण सगळे महाराष्ट्राचे पाईक आहोत याचं भान तुम्हीही ठेवा आणि लोकांना पण द्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: महापालिका निवडणूक पार पडल्यानंतर आता मनसे पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला लागली आहे. मनसेचा ९ मार्च रोजी २० वा वर्धापन दिन आहे. या निमित्ताने पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एक आदेश वजा पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी मराठी माणसांचा मुद्दा हाती घेतला असून कार्यकर्त्यांना नवीन आदेश दिला आहे.
News18
News18
advertisement

मनसेचा उद्या ९ मार्च रोजी २० वा वर्धापन दिन आहे. १९ मार्चला गुढी पाडव्याला शिवतीर्थावर मनसेचा मेळावा होणार आहे. या मेळाव्याच्या आधी राज ठाकरे यांनी सर्व मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना एक महत्त्वाची पोस्ट शेअर केली आहे. "सदस्य नोंदणी' संदर्भात ही पोस्ट आहे. पण सदस्य नोंदणी यावेळेस महाराष्ट्र म्हणून, मराठी म्हणून सामान्य मराठी माणसाची महाराष्ट्राचा पाईक होण्याची इच्छा किती तीव्र आहे आणि सरकार किती चुकीच्या पद्धतीने सर्व गोष्टी हाताळते आहे याचा राग सर्वांच्या मनात किती आहे हे देखील स्पष्ट होईल' असं म्हणत राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सूचना दिली आहे.

advertisement

काय म्हणाले राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये? 

"आपल्या पक्षाचा उद्या, ९ मार्च २०२६ ला २० वा वर्धापनदिन. मराठी माणूस आणि मराठी भाषा यांच्यासाठी आक्रमकपणे लढणाऱ्या पक्षाचा आणि एका विचाराचा हा वर्धापनदिन. या निमित्ताने पक्षाची सदस्य नोंदणी १० मार्च २०२६ पासून सुरु होत आहे. उद्या ९ मार्च ला मी सकाळी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून माझ्यापासून सदस्य नोंदणीची सुरुवात करत आहे. या रायगडाने महाराजांचं वास्तव्य अनुभवलंच पण 'शिवराज्याभिषेकाचा' साक्षीदार देखील हा किल्लाच. अशा पावन ठिकाणी जाऊन आपण आपली सदस्य नोंदणी सुरू करत आहोत.

advertisement

आपली सदस्य नोंदणी ही महाराष्ट्र सैनिकांपुरतीच मर्यादित नाही हे मुळात लक्षात घ्या. तुम्ही सदस्य नोंदणी कराच, पण ज्यांना ज्यांना महाराष्ट्राला आकार द्यायचा आहे, ज्यांना ज्यांना सद्य परिस्थितीबद्दल राग आहे अशा सगळ्यांना आपल्याला, आपल्या नवनिर्माणाच्या ध्यासासोबत जोडून घ्यायचं आहे. तुमच्यासकट जे जे नव्याने आपल्यासोबत जोडले जाणार आहेत, ते आपण सगळे महाराष्ट्राचे पाईक आहोत याचं भान तुम्हीही ठेवा आणि लोकांना पण द्या.

advertisement

सदस्य नोंदणी डिजिटल स्वरूपात पण करणार आहोत ज्याचा तपशील तुम्हाला १० मार्चला कळलेच, फक्त पक्षाच्या शाखांच्या बाहेर स्टॉल्स लावून चालणार नाही तर सर्व वर्दळीच्या ठिकाणी माझे महाराष्ट्र सैनिक दिसले पाहिजेत, उदा . मार्केट, शाळा , मंदिरं , कॅालेज , मैदानं , बागा वगैरे अशा गजबजलेल्या सर्व ठिकाणी आपली सदस्य नोंदणीची टेबल्स लागली पाहिजेत. येणाऱ्या जाणाऱ्यांशी संवाद साधत त्यांना आपलंस करत ही सभासद नोंदणी करा. यासाठी तुम्हाला जी मदत लागेल ती आपले सर्व पदाधिकारी तसेच शहर अध्यक्ष, उप शहर अध्यक्ष, उपाध्यक्ष , सरचिटणीस आणि पक्षाच्या नेत्यांना कळवा, तसे आदेश मी त्यांना दिले आहेत.

advertisement

प्रश्न आकड्याचा नाहीये, तशीही आपली सदस्य नोंदणी ही कायम मोठीच होते. पण यावेळेस महाराष्ट्र म्हणून, मराठी म्हणून सामान्य मराठी माणसाची महाराष्ट्राचा पाईक होण्याची इच्छा किती तीव्र आहे आणि सरकार किती चुकीच्या पद्धतीने सर्व गोष्टी हाताळते आहे याचा राग सर्वांच्या मनात किती आहे हे देखील स्पष्ट होईल ! त्यामुळे जोरदार सदस्य नोंदणी होईल यासाठी पूर्ण कसोशीने प्रयत्न करा. तुम्हाला वर्धापनदिनाच्या शुभेच्छा. स्वतःची तसंच आपल्या परिवाराची आणि महाराष्ट्राची काळजी घ्या.

धन्यवाद

आपला नम्र

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
AI चा खास कोर्स मोफत शिका! पिंपरी चिंचवडमध्ये कुठे करायची नावनोंदणी?
सर्व पहा

राज ठाकरे

मराठी बातम्या/मुंबई/
'सरकार किती चुकीच्या...' राज ठाकरेंचा मनसेसैनिकांना वर्धापन दिनी नवा आदेश, पोस्टमध्ये म्हणाले...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल