मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी स्थानिक पातळीवर असे निर्णय घेतले जातात, असे सांगून एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या युतीला पक्षाची काही हरकत नसल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले आहे. तसेच स्थानिक पातळीवर तडजोडी होतात, कराव्या लागतात, असे ते म्हणाले.
राजू पाटील यांच्याकडून शिवशक्ती आघाडीची घोषणा, बाळा नांदगावकर म्हणाले...
मनसेने एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक पातळीवर आमचे माजी आमदार राजू पाटील यांनी तसा निर्णय घेतला आहे. काही वेळा पक्ष म्हणून तुम्हाला तडजोडी कराव्या लागतात. स्थानिक पातळीवर अशा युती आघाडी होत असतात, असे बाळा नांदगावकर म्हणाले.
advertisement
महापालिका निवडणुकीत ज्या पक्षावर प्रखर टीका केली, त्यांच्या धोरणांची चिरफाड केली, त्यांनाच पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने पक्षाकडून पक्षशिस्त भंगाची कारवाई होणार आहे का? असे विचारले असता, हा सर्वस्वी पक्षप्रमुखांचा निर्णय आहे, असे नांदगावकर म्हणाले.
राजू पाटील काय म्हणाले?
स्थानिक पातळीवर निर्णय घ्या, असे राज ठाकरे यांचे आदेश होते. त्यानुसार आम्ही कल्याण डोंबिवलीत शिवशक्ती आघाडी स्थापन केली आहे. सत्तेत असल्यानंतर कामे होतात. बाहेर राहून जनतेची कामे झाली नसती. काही वेळा स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावे लागतात, असे मनसेचे माजी आमदार राजू पाटील म्हणाले.
