TRENDING:

LIVE NOW

BMC Election Result Live: ठाकरे बंधू आणि भाजपमध्ये टफ फाइट, काही क्षणात पहिला कल येणार

Last Updated:

BMC निवडणूक निकाल Live update: शाईचा घोळ, पैसे वाटण्यावरुन वाद इतकं सगळं झालं असतानाही पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना मुंबई महानगरपालिकेवर आपलं वर्चस्व निर्माण करण्यात यश येणार की कमळ फुलणार? या सगळ्याचा आज फैसला होणार आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
BMC Election Result Live: मुंबईचा नवा किंग कोण होणार? याची उत्सकता लागली आहे. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. शाईचा घोळ, पैसे वाटण्यावरुन वाद इतकं सगळं झालं असतानाही पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना मुंबई महानगरपालिकेवर आपलं वर्चस्व निर्माण करण्यात यश येणार की कमळ फुलणार? या सगळ्याचा आज फैसला होणार आहे.
News18
News18
advertisement
Jan 16, 202610:09 AM IST

भायखळा परिसरात मुंबई महापालिकेच्या पोस्टल मतदारांची रोहिदास लोखंडे यांना पसंती

भायखळा परिसरात मुंबई महापालिकेच्या पोस्टल मतदारांची रोहिदास लोखंडे यांना पसंती २०७ रोहिदास लोखंडे यांची पोस्टल मतदानात आघाडी भाजपची पोस्टल मतदानात आघाडी
Jan 16, 20269:24 AM IST

वॉर्ड १९५ प्रमुख लढती काय?

संतोष खरात माजी नगरसेवक , परंतु यंदा उमेदवारी नाही, आरक्षण बदलामुळे, आता शिंदे सेनेत आहेत १) विजय भणगे ठाकरेंचे शाखा प्रमुख रिंगणात
२) राजेश कांबळे भाजपचे मुख्य लढत या दोघांमध्ये मराठी टक्का ६५%
गुजराती २५%
बाकी इतर भाषिक तेलगू ९ हजार आहेत, आणि तो भाजपकडे वळलेला आहे . भाजपचा सक्रिय कार्यकर्ता राजेश कांबळे आहे. अप्पर वरळी, लोवर परळ म्हणून ओळखला जाणारा भाग मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू परिसर मिश्रण आहे गिरणी कामगार याच परिसरात राहतात , BDD वसाहत याच मतदारसंघात आहेत BDD पुनर्विकास सुरू आहे, पण श्रेयवादाची लढाई सुरू आहे
Jan 16, 20269:24 AM IST

वॉर्ड १९३- प्रमुख लढती वरळीत काय होत्या ?

१) हेमांगी वरळीकर माजी नगरसेविका आणि आत पुन्हा ठाकरेंची उमेदवार
२) सूर्यकांत कोळी अपक्ष, ठाकरे यांचा शाखा प्रमुख
३) प्रल्हाद वरळीकर शिंदे सेना
४) अभिजित नागवेकर राष्ट्रवादी दादा गट मुख्य लढत, ही तिरंगी लढत कोळीवाड्यात हेमांगी नगरसेविका आहेत, माजी उप महापौर वरळीकरयांच्यावर कोस्टल प्रोजेक्टमुळे स्थानिक नाराज आहेत, सूर्यकांत कोळी १५ वर्ष शाखा प्रमुख आहेत, आणि त्यांचा जनसंपर्क दांडगा ठेवलाय पुनर्विकास प्रश्न, आणि झोपडपट्टी माफियांचा हैदोस, त्यामुळे कोळीवाड्यात इतर धर्मीय आणि प्रांतीय आक्रमण वाढतंय मराठी टक्का या परिसरात मोठा आहे, ६०%
इतर भाषिक ४०%
advertisement
Jan 16, 20269:23 AM IST

आमदार आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात ठाकरे विरुद्ध शिंदे थेट सामना रंगला

वरळी विधानसभा क्षेत्रात आज महापालिका निवडणूक संघर्षाला पूर्णविराम मिळणार वरळीकरांनी निवडून दिलेले नगरसेवक कोण ? आज स्पष्ट होणार आमदार आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात ठाकरे विरुद्ध शिंदे थेट सामना रंगला वरळीतील स्थानिक वर्ग धार्मिक बलाबल मराठी भाषिक : 55–60%
मुस्लिम : 20–25%
उत्तर भारतीय / गुजराती / इतर : 15–20%
Jan 16, 20269:14 AM IST

ठाकरे बंधूंचं एकत्र येणं गेमचेंजर ठरणार की सत्ता पलटणार? थोड्याच वेळात फैसला

मतमोजणीसाठी केवळ काही मिनिटं शिल्लक राहिली आहेत. मतपेट्या उघडणार आहेत. मतदारांनी ठाकरे बंधूंच्या कौल देणार की नाही ते आता कळणार आहे.
Jan 16, 20266:57 AM IST

BMC election Result Live: मुंबईकरांचा कौल कुणाला? BMC वर कुणाचा झेंडा फडकणार?

मुंबई महागनरपालिकेत अनेक ठिकाणी शाईवरुन वाद झाला. शाई पुसली जात असल्याने आणि बोगस मतदान या दोन मुद्द्यांवर महानगरपालिका निवडणुकीचं वातावरण तापलं होतं. मुंबईत महानगरपालिकेसाठी एकूण मतदान 55 टक्क्यांपर्यंतच झालं आहे. मुंबईकरांचा कौल कुणाला मिळणार ते 10 वाजता स्पष्ट होणार आहे.
advertisement
Jan 16, 20266:55 AM IST

Mumbai BMC election Result Live: मुंबई महापालिकेवर फडकणार कुणाचा झेंडा?

मुंबई महापालिकेवर फडकणार कुणाचा झेंडा..बहुचर्चित महापालिकेचा निकाल आज होणार जाहीर आज …ठाकरे बंधू की भाजप-शिवसेना कोण मारणार बाजी…याकडे सर्वांचं लक्ष
मराठी बातम्या/मुंबई/
BMC Election Result Live: ठाकरे बंधू आणि भाजपमध्ये टफ फाइट, काही क्षणात पहिला कल येणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल