TRENDING:

‘त्या’ अवयवाचे दोन भाग केले, 17 तास शस्त्रक्रिया अन्..., ‘मृत्यू’नं वाचवले दोन जीव!

Last Updated:

Mumbai News: डोंबिवलीतील एका रुग्णालयात 38 वर्षीय व्यक्तीला मेंदूमृत घोषित करण्यात आले. त्यांच्या कुटुंबीयांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : “अवयवदान हे श्रेष्ठ दान” हे वाक्य फक्त बोलण्यासाठी नाही, तर त्यामागे एखाद्याला नवजीवन देण्याची ताकद असते. आजकाल अनेकजण याचे महत्त्व ओळखून अवयवदानासाठी पुढे येत आहेत. अशाच एका घटनेत, एका मेंदूमृत व्यक्तीच्या अवयवदानामुळे दोन रुग्णांना नवं आयुष्य मिळाल्याची घटना मुंबईत घडली आहे.
‘त्या’ अवयवाचे दोन भाग केले, 17 तास शस्त्रक्रिया अन्..., ‘मृत्यू’नं वाचवले दोन जीव!
‘त्या’ अवयवाचे दोन भाग केले, 17 तास शस्त्रक्रिया अन्..., ‘मृत्यू’नं वाचवले दोन जीव!
advertisement

परळ येथील खासगी रुग्णालयात स्प्लिट लिव्हर ट्रान्सप्लांट ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. या पद्धतीमध्ये एका दात्याचे यकृत दोन भागांत विभागून ते दोन वेगवेगळ्या रुग्णांमध्ये प्रत्यारोपित केले जाते.

सायन येथील 44 वर्षीय रुग्ण गेल्या काही वर्षांपासून यकृताच्या गंभीर आजाराने त्रस्त होते. त्यांच्या पोटात पाणी साचणे आणि कावीळ अशी लक्षणे होती. डॉक्टरांनी त्यांना यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला दिला होता आणि ते 2021 पासून दात्याच्या प्रतीक्षेत होते. त्याच वेळी नेरूळ येथील तीन वर्षांचा एक बालरुग्ण दुर्मीळ यकृताच्या आजाराने ग्रस्त होता. या आजारामुळे त्याची वाढ थांबली होती आणि त्याच्यासाठी प्रत्यारोपण हाच एकमेव पर्याय होता.

advertisement

Crime : रिक्षात बसू दिलं नाही, अल्पवयीन मुलांचं डोकं फिरलं, 'त्या' घटनेनं कुर्ला हादरलं!

डोंबिवलीतील एका रुग्णालयात 38 वर्षीय व्यक्तीला मेंदूमृत घोषित करण्यात आले. त्यांच्या कुटुंबीयांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर डॉक्टरांनी 9 फेब्रुवारी 2026 रोजी यकृताचे दोन भाग केले. मोठा भाग प्रौढ रुग्णाला आणि लहान भाग बालरुग्णाला प्रत्यारोपित करण्यात आला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबाच्या दरात मोठी उसळी, कांद्याने केली आजही निराशा, केळीला काय मिळाला भाव?
सर्व पहा

ही शस्त्रक्रिया सुमारे 15 ते 17 तास चालली. ही प्रक्रिया अवघड मानली जाते आणि भारतात क्वचितच केली जाते. मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे दोन्ही रुग्णांना यशस्वीपणे उपचार मिळाले. दरम्यान, या घटनेमुळे अवयवदानाचे महत्त्व पुन्हा एकदा समोर आले आहे. योग्य वेळी घेतलेल्या निर्णयामुळे दोन जणांचे जीव वाचू शकतात, हे यामधून स्पष्ट झाले आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
‘त्या’ अवयवाचे दोन भाग केले, 17 तास शस्त्रक्रिया अन्..., ‘मृत्यू’नं वाचवले दोन जीव!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल