advertisement

Crime : रिक्षात बसू दिलं नाही, अल्पवयीन मुलांचं डोकं फिरलं, 'त्या' घटनेनं कुर्ला हादरलं!

Last Updated:

Kurla News : कुर्ला शहरातून एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नक्की काय घडलं आणि कोणत्या प्रकारातून घडलं ते ऐकून तुम्हीही हादरुन झालं.

रिक्षात बसू दिलं नाही म्हणून अल्पवयीनांकडून थरकाप उडवणारी घटना
रिक्षात बसू दिलं नाही म्हणून अल्पवयीनांकडून थरकाप उडवणारी घटना
मुंबई : मुंबई शहरातील उपनगरात काही अजूनही प्रवासासाठी रिक्षाचा वापर होत असतो. कित्येकदा रिक्षाचालक आणि प्रवाशांमध्ये वाद आणि हाणामारीही होते. तो वाद काही वेळानंतर निवळून जातो. पण कुर्लातून समोर आलेल्या प्रकाराने संपूर्ण शहर हादरुन गेलं आहे. या घटने प्रकरणी अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ल्याच्या साबळे नगरातील एका ब्लिडिंग समोर मयत रिक्षाचालक जयराम नायडू (वय48) यांनी त्यांची ऑटो रिक्षा उभी केली होती. पण त्याच वेळी त्यांच्या रिक्षात त्या परिसरातील एक अल्पवयीन मुलगा बसण्यास जात होता,त्यावरुन ऑटो रिक्षा चालकाने मुलाला रिक्षात बसण्यापासून टोकले.
एक नकार अन् एकाचा जीव गेला
ऑटो रिक्षा चालकाच्या बोलण्याचा राग अल्पवयीन मुलाला आला त्याच रागात त्याने सोबत आणलेल्या चाकूने जयराम यांच्या मानेवर थेट वार केला. हा वार इतका गंभीर होता की जयराम जे जागेवर रक्ताच्या थारोळ्यात पडले.
advertisement
रिक्षा चालकासोबत घडलेला प्रकार नागरिकांना समजताच घटनास्थळी गर्दी जमा होऊन त्यांना जवळच्या रुग्णालयात तातडीने नेले मात्र डॉक्टरांनी रिक्षा चालकाला मृत घोषित केले.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Crime : रिक्षात बसू दिलं नाही, अल्पवयीन मुलांचं डोकं फिरलं, 'त्या' घटनेनं कुर्ला हादरलं!
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement