TRENDING:

Mumbai CNG Shortage: मुंबईकरांनो, CNG भरायला पंपावर जाऊ नका, दुरुस्तीबद्दल मोठी अपडेट, उद्याचाही दिवस जाणार!

Last Updated:

ठिकठिकाणी स्टेशनवर सीएनजी भरण्यासाठी रांगा लागल्या आहेत. पण आता हे संकट मंगळवारपर्यंत कायम राहणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सुश्मिता भदाणे, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

मुंबई: मुंबईमध्ये अचानक गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. अचानक मुंबईभरात सीएनजी गॅसचा साठा कमी झाला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी सीएनजीसाठी रांगा लागल्या आहे. त्यामुळे मुंबईत बेस्ट वाहतूक आणि खासगी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. ठिकठिकाणी स्टेशनवर सीएनजी भरण्यासाठी रांगा लागल्या आहेत. पण आता हे संकट मंगळवारपर्यंत कायम राहणार आहे. १८ नोव्हेंबर दुपारी २ वाजेपर्यंत  काम सुरू राहणार आहे.

advertisement

मुंबई महानगर गॅसच्या पाईपलाईनमध्ये झालेल्या बिघाडाचा फटका मुंबईकरांना बसू लागला आहे. महानगर गॅस लिमिटेड MGL च्या वडाळा येथील City Gate Station (CGS) मध्ये कालपासून गॅस पुरवठा बाधित झाला आहे.  MGL आपल्या घरगुती PNG ग्राहकांना प्राधान्याने आणि अखंडित पुरवठा मिळावा याची काळजी घेत आहे. मात्र CGS वडाळा इथं पुरवठा बंद असल्यामुळे संपूर्ण MGL पाइपलाइन नेटवर्कवर परिणाम झाला आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील काही CNG स्टेशन्स कार्यरत नाहीत.

advertisement

सध्या महानगर लिमिटेडच्या एकूण 389 CNG स्टेशन्सपैकी 225 स्टेशन्स चालू आहे.  पाइपलाइनचं नुकसान दुरुस्त झाल्यानंतर आणि CGS वडाळा येथे पुरवठा पुन्हा सुरू झाल्यानंतर MGL च्या संपूर्ण नेटवर्कमधील गॅस पुरवठा सामान्य होईल. दुरुस्तीचे काम सुरू आहे आणि 18 नोव्हेंबर 2025 दुपारपर्यंत पुरवठा पूर्णपणे सुरळीत होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे  होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, असं महानगर गॅस लिमिटेडकडून सांगण्यात आलं आहे.

advertisement

काय झाला नेमका बिघाड? 

मुंबईत जवळपास 486 CNG पंप आहेत. आरसीएफ कंपाउंडमधील गेलच्या मुख्य गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यामुळे वडाळामध्ये असलेल्या महानगर गॅसच्या सिटीगेट स्टेशनचा गॅस पुरवठा प्रभावित झाला. तांत्रिक अडचणी आणि पुरवठ्यातील कपातीमुळे हा तुटवडा झाल्याची माहिती MGL कडून देण्यात आली आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
एका एकरात केली काकडी लागवड, 60 दिवसांत 1 लाख कमाई,शेतकऱ्याने सांगितला फॉर्म्युला
सर्व पहा

पुढे २४–४८ तासांत स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. सीएनजीच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्यामुळे मुंबई शहरांवर मोठा परिणाम पाहायला मिळत आहे. याचा थेट परिणाम मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील बस, रिक्षा, टॅक्सी ,ओला-उबरवरही त्याचा परिणाम झाला आहे. मंगळवारी सकाळपर्यंत ही सेवा पूर्ववत होऊ शककली नाही तर स्कुल बस रस्त्यावर उतरवणे कठीण होईल. मुंबईकरांच्या दैनंदिन व्यवहारावर ह्या सीएनजी तुटवड्यामुळे मोठा फटाका बसला आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai CNG Shortage: मुंबईकरांनो, CNG भरायला पंपावर जाऊ नका, दुरुस्तीबद्दल मोठी अपडेट, उद्याचाही दिवस जाणार!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल