गोरेगावमध्ये 17 वर्षीय मुलीने बॉयफ्रेंडच्या जाचाला कंटाळून तिने आत्महत्या केली आहे. एआयचा वापर करून मॉर्फ फोटो तयार करून अश्लील फोटोज् व्हायरल करण्याची धमकी प्रियकराने दिल्यामुळे ती मुलगी नैराश्यात होती. या मुलीने नैराश्यात गळफास घेत आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. गोरेगावमध्ये राहणाऱ्या 17 वर्षीय मुलीचे तिच्या परिसरातील एका तरूणासोबत प्रेमसंबंध होते. ती मुलगी त्या तरूणासोबत ऑगस्ट महिन्यामध्ये चेन्नईला पळून गेली होती. त्यावेळी तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेऊन तिला परत मुंबईला घेऊन आले होते.
advertisement
मुलीच्या कुटुंबीयांनी तिला पुन्हा घरी परत आणल्यानंतर तिला " त्या तरूणासोबत बोलू नको आणि त्याला भेटूही नको." असं सांगितलं होतं. त्यानंतर मुलीने त्या तरूणासोबत बोलणं सोडलं होतं. आपली प्रेयसी आपल्यासोबत बोलावी म्हणून त्याने एक युक्ती वापरली. आरोपी तरूणाने एआय तंत्रज्ञानाचा वापर करून मुलीचे काही अश्लील फोटो तयार केले. हे अश्लील फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल करेल, अशी तिला धमकी देत तिच्याकडून पैशांची मागणी करत होता. यामुळे घाबरलेल्या त्या मुलीने आपल्या घरातच चोरी करून बॉयफ्रेंडला पैसे दिले. अचानक घरातून पैसे गायब झाल्यामुळे त्या मुलीच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली.
त्या मुलीच्या वडीलांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपी तरूणाला ताकिद देऊन सोडून दिलं. पण सतत त्या तरूणाकडून मुलीला ब्लॅकमेलिंग केलं जात होतं. ब्लॅकमेलिंगच्या त्रासाला कंटाळून ती मुलगी तणावात गेली. तिने बुधवारी (19 नोव्हेंबर) घरी कोणीही नसताना जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. घरात कोणीही नसताना 17 वर्षीय मुलीने गळफास घेत आपले जीवन संपवले. या घटनेनंतर मुलीचा बॉयफ्रेंड फरार झाला. पोलिसांनी त्याच्याविरोधात भादविच्या कलम 108 अतंर्गत गुन्हा दाखल करत शोध सुरू केला आहे. पोलिस प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत.
