नेमके प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार गौरी शंभू (वय 75) या पतीसोबत चुन्नाभटीमध्ये वास्तव्यास आहेत. गौरी यांच्या सासूला भारतीय चलनातील नाणी गोळा करुन साठवण्याचा छंद होता. त्यांनी त्यांच्या हयातीत अनेक भारतीय चलनातील जुनी नाणी जमाही केली होती. 2015 मध्ये सासूच्या मृत्यूनंतर ती नाणी गौरी यांच्या पतीकडे होती. जुन्या नाण्यांची चांगली किंमत मिळत असते हे या दाम्पत्याला माहिती होते.
advertisement
2025 मे मध्ये गौरी यांना फेसबूकवर एक ओल्ड कॉईन कंपनीची जाहिरात दिसली. ज्यात एक क्रमांक होता त्यानुसार त्यांनी त्यावर संपर्क केला. फोनवर समोरुन बोलणाऱ्या व्यक्तीने त्याने नाव अनिलकुमार असून तो ओल्ड कॉईन कंपनीचा कर्मचारी असल्याचे सांगितले. कर्मचाऱ्याच्या सांगण्यावरुन गोरी यांनी त्यांच्या जवळ असलेल्या जुण्या कॉईनचे त्याला व्हॉट्सअॅपवर फोटोही पाठवविले.
'या' गोष्टीमुळे गौरी फसल्या
अनिलकुमारने फोटो पाहून त्या जुण्या कॉईनचे 50 ते 60 लाख मिळतील असे सांगितले आणि त्यांचा विश्वास संपादन केला. पुढे कर्मचाऱ्याने गौरी यांच्याकडून कॉईनची खरी किंमत काढणे तसेच व्हॅल्यूएशन करणे अशा अनेक गोष्टींसाठी विविध कारण देत जानेवारी 2026 पर्यंत गोरी यांच्याकडून 19 लाख रुपये उकळले.
अटकेची धमकी अन् फसवणूक
धक्कादायक गोष्ट म्हणजे, अनिलकुमारने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात व्हॉट्सअॅपद्वार कॉल करुन गौरी यांना आणखीन पैसे देण्यास सांगितले. जर अधिकचे पैसे न दिल्यास आयकर अधिकाऱ्यांना सांगूत ते अधिकारी घरी येऊन अटक करतील अशी धमकी देत अजूनही रक्कम उकळल्याचा आरोपा गौरीनी तक्रारीत केला आहे.
