TRENDING:

Mumbai Local: मुंबईकरांनो, रविवारी लोकलने फिरण्याचा प्लॅन? थांबा! तिन्ही मार्गांवर 'मेगाब्लॉक'; पाहा कसं असेल वेळापत्रक

Last Updated:

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर (मध्य, पश्चिम आणि हार्बर) उद्या म्हणजेच रविवारी (१ मार्च) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रुळांची देखभाल आणि तांत्रिक कामांसाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर (मध्य, पश्चिम आणि हार्बर) उद्या म्हणजेच रविवारी (१ मार्च) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रुळांची देखभाल आणि तांत्रिक कामांसाठी हा ब्लॉक घेतला जाणार असून, यामुळे सुट्टीच्या दिवशी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांचा मोठा खोळंबा होण्याची शक्यता आहे.
Mumbai Local: मुंबईकर रविवारी खोळंबा होणार, तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक
Mumbai Local: मुंबईकर रविवारी खोळंबा होणार, तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक
advertisement

1. मध्य रेल्वे: सीएसएमटी ते विद्याविहार

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. या काळात धिम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येतील. परिणामी, मशीद बंदर, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी आणि करी रोड या स्थानकांवर लोकल थांबणार नाहीत.

advertisement

2. हार्बर रेल्वे: कुर्ला ते वाशी

हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी दरम्यान सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. या काळात सीएसएमटी ते वाशी/बेलापूर/पनवेल दरम्यानची सेवा पूर्णपणे रद्द राहील. प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी-कुर्ला आणि पनवेल-वाशी दरम्यान विशेष लोकल चालवल्या जातील. हार्बरचे प्रवासी ठाणे-वाशी/नेरूळ मार्गे प्रवास करू शकतील.

3. पश्चिम रेल्वे: चर्चगेट ते मुंबई सेंट्रल

advertisement

पश्चिम रेल्वेवर चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल दरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत ५ तासांचा जम्बो ब्लॉक असेल. या काळात सर्व धिम्या लोकल जलद मार्गावर चालवल्या जातील.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
डाळिंबाच्या दरात उलथापालथ, आल्याला 9000 रुपये मिळाला भाव, द्राक्षाची काय स्थिती?
सर्व पहा

मेगाब्लॉकमुळे लोकल गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी आपले प्रवासाचे नियोजन वेळेत करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local: मुंबईकरांनो, रविवारी लोकलने फिरण्याचा प्लॅन? थांबा! तिन्ही मार्गांवर 'मेगाब्लॉक'; पाहा कसं असेल वेळापत्रक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल