नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांसाठी रेल्वेकडून विशेष रेल्वे उपलब्ध करून दिल्या आहेत. 31 डिसेंबर 2025 च्या मध्यरात्री आणि 1 जानेवारी 2026 च्या पहाटे प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य आणि पश्चिम रेल्वेने विशेष लोकल ट्रेन (Special Local Trains) चालवण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक मुंबईकर थर्टीफस्टचं सेलिब्रेशन करण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया, मरिन ड्राईव्ह आणि गिरगाव चौपाटीवर लाखो लोक जमतात. रात्री उशिरा सेलिब्रेशन आटोपल्यानंतर घरी परतण्यासाठी प्रवाशांना वाहतुकीच्या अडचणी येऊ नयेत, यासाठी रेल्वेने विशेष लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
विशेष लोकल ट्रेनचं वेळापत्रक कसं असेल?
मध्य रेल्वे
- बुधवारी मध्यरात्री 1:30 वाजता सीएसएमटीवरून लोकल सुटेल आणि कल्याण स्थानकावर मध्यरात्री 3 वाजता पोहोचेल.
- बुधवारी मध्यरात्री 1:30 वाजता कल्याणवरून लोकल सुटेल आणि सीएसएमटी स्थानकावर मध्यरात्री 3 वाजता पोहोचेल.
हार्बर रेल्वे
- बुधवारी मध्यरात्री 1:30 वाजता सीएसएमटीवरून पनवेलसाठी लोकल सुटेल.
- बुधवारी मध्यरात्री 1:30 वाजता पनवेलवरून लोकल सुटेल आणि सीएसएमटी स्थानकावर मध्यरात्री 2:50 वाजता पोहोचेल.
पश्चिम रेल्वे
पश्चिम रेल्वेवर 31 डिसेंबरच्या रात्री एकूण आठ विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. मध्यरात्री 1:15 वाजता, 2 वाजता, 2:30 वाजता आणि 3:25 वाजता चर्चगेट येथून विरारसाठी विशेष लोकल रवाना होतील. तर याच वेळेत विरार येथून चर्चगेटच्या दिशने चार लोकल चालवण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वेवर चालवल्या जाणाऱ्या विशेष लोकलमुळे रात्री उशिरापर्यंत थर्टी फर्स्ट साजरा करणाऱ्या मुंबईकरांना घरी जाण्यासाठी सुरक्षित आणि सोयीस्कर पर्याय उपलब्ध झाला आहे. रेल्वे स्थानकांवरील गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात येणार आहे.
