स्टेशनवर उतरलं की लगेच आराम
पश्चिम रेल्वेने प्रवाशांची वाढती गर्दी आणि मुंबई शहरात निवासाची सोय होण्यासाठी अंधेरी या रेल्वे स्थानकावर स्लीपिंग पॉड्स सुरु करण्याचा निर्णय हाती घेतला आहे. या निर्णयामुळे काही तासांसाठी सुरक्षित पण आणि स्वस्त निवारा खरंच आवश्यक असलेल्या प्रवाशांसाठी फायदेशीर ठरणार आहे.या विशेष प्रकल्पासाठी अंधेरी स्थानकाच्या दुसऱ्या मजल्यावर अंदाजे 5,000 चौरस फुटांजी जागा राखून ठेवण्यात आलेली आहे.
advertisement
मुंबईत याआधी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर स्लीपिंग पॉड्स सुरु करण्यात आले होते आणि याला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद लाभला होता. यामुळे आता अंधेरीत सुरु करणाऱ्या या सेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद लाभेल अशी अपेक्षा आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 21, 2026 2:10 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : काय सांगता! स्वस्त दरात 'फाईव्ह स्टार झोप', मुंबईतील 'या' स्टेशनवर उतरलं की लगेच आराम
