TRENDING:

Mumbai: शाळेतून घरी चाललेल्या चिमुकल्याला एसटी चालकाने उडवलं; उलट्या काळजाचा ड्रायव्हर खुशाल हसला

Last Updated:

अपघातानंतर समोर आलेल्या बसचालकाच्या हसऱ्या फोटोमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुंबईतील लालबाग परिसरात घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण शहर हादरले आहे. या अपघातात चार वर्षांचा चिमुकला अथांग तावडे गंभीर जखमी झाला . त्यानंतर त्याच्यावर रुग्णालयातील पीआयसीयू (PICU) विभागात अतिदक्षता उपचार सुरू होते. आठवडभर तो उपचाराला प्रतिसाद देत होता. मात्र अखेर त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. अपघातानंतर समोर आलेल्या बसचालकाच्या हसऱ्या फोटोमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
News18
News18
advertisement

अथांग हा आपल्या वडिलांसोबत दुचाकीवरून शाळेतून घरी परतत असताना हा अपघात घडला. जखमी मुलाचे वडील आणि तक्रारदार मंदार तावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते परळ ब्रिज उतरून सेंट्रल रेल्वे वर्कशॉपजवळील सिग्नलवर थांबले होते. सिग्नल सुटण्यास अवघे 10 ते 15 सेकंद बाकी असताना मागून भरधाव वेगात आलेल्या शिवशाही बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेचा वेग इतका प्रचंड होता की दुचाकी रस्त्यावर फेकली गेली आणि अथांग गंभीर जखमी झाला.

advertisement

अतिदक्षता विभागात उपचार सुरू

ही शिवशाही बस (क्रमांक MH09 EM 8639) असून बसचालकाचे नाव शामराव नाथराव नगरगोजे असे आहे. चालकाने वाहनावर नियंत्रण न ठेवता निष्काळजीपणे आणि वेगात बस चालवल्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. अपघातात अथांगच्या डोक्याला आणि शरीराच्या विविध भागांना गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरूहोते. अखेर झुंज अपयशी ठरली असून त्याचा मृत्यू झाला आहे. मंदार तावडे यालाही या अपघातात दुखापत झाली आहे.

advertisement

बसचालकाला पोलिसांनी तात्काळ अटक केली

दरम्यान, संबंधित बसचालकाला पोलिसांनी तात्काळ अटक केली होती. मात्र, नंतर त्याला जामिनावर सोडण्यात आले. यानंतर बसचालकाचा हसतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे. एवढ्या गंभीर अपघातानंतरही चालकाच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा लवलेश नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

वाहतूक सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर

advertisement

या घटनेनंतर स्थानिक नागरिक, सामाजिक संघटना आणि पालकवर्गाकडून दोषी चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनचालकांवर अधिक कडक नियंत्रण ठेवावे आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे, अशी मागणीही जोर धरू लागली आहे. या अपघातामुळे पुन्हा एकदा शहरातील वाहतूक सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे.

हे ही वाचा :

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्याचा प्रयोग भारी, अर्ध्या एकरमध्ये केली आंतरपीक शेती, 2 लाख उत्पन्न
सर्व पहा

आधी प्रेमविवाह; मग दुसऱ्यासोबतच जुळलं, वैतागलेल्या आईनंच लेकीला संपवलं, संभाजीनगरच्या 'त्या' प्रकरणात शॉकिंग खुलासा

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai: शाळेतून घरी चाललेल्या चिमुकल्याला एसटी चालकाने उडवलं; उलट्या काळजाचा ड्रायव्हर खुशाल हसला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल