संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या सुरक्षा दलात
मृत आलोक यांचे कौटुंबिक पार्श्वभूमी देखील अत्यंत प्रतिष्ठित आहे. त्यांचे वडील अनिल कुमार हे देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या सुरक्षा दलात कार्यरत आहेत. मुलाच्या निधनाची बातमी समजताच ते मुंबईत दाखल झाले आहेत. आलोक यांच्या कुटुंबात अनेक जण शिक्षकी पेशात असून, त्यांच्या अशा जाण्याने सिंह कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
advertisement
चिमटा काढून आलोकच्या पोटात खुपसला
या हत्येमागील मुख्य कारण म्हणजे ट्रेनमधून उतरताना लागलेला किरकोळ धक्का असल्याचे समोर आले आहे. आलोक सिंह आणि आरोपी ओंकार शिंदे यांच्यात या कारणावरून जोरदार वाद झाला होता. हा वाद इतका विकोपाला गेला की, संतापलेल्या ओंकारने आपल्याजवळील चिमटा काढून आलोक यांच्या पोटात खुपसला. या हल्ल्यानंतर आरोपी तातडीने तेथून पसार झाला होता, मात्र पोलिसांनी आता त्याला अटक केली आहे.
एनएम महाविद्यालयात प्राध्यापक
आलोक सिंह हे मुंबईतील नामांकित एनएम महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. विशेष म्हणजे, ज्या दिवशी ही घटना घडली त्याच दिवशी त्यांच्या पत्नीचा वाढदिवस होता. आपल्या पत्नीला बर्थडे डिनरसाठी बाहेर नेण्याचे स्वप्न आलोक पाहत होते. मात्र, एका सनकी तरुणाच्या रागामुळे एका हसत्याखेळत्या कुटुंबाचा आनंद कायमचा हिरावला गेला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
व्हिडिओ पोलिसांच्या हाती
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर आता आरोपी ओंकार शिंदे याचा स्टेशनवरून पळतानाचा एक व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला आहे. या पुराव्यामुळे तपासाला मोठी गती मिळाली असून आरोपी आता कोठडीत आहे. रेल्वे प्रवासादरम्यान होणारे किरकोळ वाद किती भयानक वळण घेऊ शकतात, याचे हे एक विदारक उदाहरण ठरले आहे.
