मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या कार्यालयातील पथकाला महत्त्वाची तपासणी करण्याची परवानगी देण्यासाठी कामकाजात बदल करण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच बाहेर पडावे, असे आवाहन मुंबई मेट्रोकडून करण्यात आले आहे.
advertisement
मेट्रो मार्गिका 7 आणि मेट्रो मार्गिका 9 (फेज 1) दरम्यान मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी मंजुरी मिळण्यापूर्वी तपासणी आवश्यक आहे. त्यात आवश्यक सिस्टम इंटिग्रेशन तपासणी आणि सुरक्षा चाचण्यांचा समावेश असेल. हे टप्पे अंधेरी (पूर्व) ते मीरा भाईंदरपर्यंत थेट मेट्रो कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या प्रक्रियेचा एक भाग आहेत, ज्यामुळे भविष्यात प्रवाशांना अधिक सहज आणि सोयीस्कर प्रवास मिळण्याची अपेक्षा आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 11, 2025 7:07 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Metro: मुंबई मेट्रोबद्दल मोठी बातमी, Metroच्या वेळापत्रकात बदल, या स्थानकांवर होणार परिणाम
