TRENDING:

Mumbai Metro 3: ॲक्वा लाईनवर मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ, केव्हापासून सुरू होणार अतिरिक्त सेवा? वाचा संपूर्ण वेळापत्रक

Last Updated:

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)ने मेट्रो लाईन 3 ॲक्वा लाईनवर मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली जाणार आहे. वाढती गर्दी लक्षात घेता, उत्तर आणि दक्षिण मुंबईला जोडणाऱ्या ॲक्वा लाईनवर नवीन वर्षापासून मेट्रोच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)ने मेट्रो लाईन 3 ॲक्वा लाईनवर मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली जाणार आहे. ऑक्टोबर 2025 पासून सुरू झालेल्या ह्या मेट्रो सेवेला प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत ॲक्वा लाईनवर 265 फेऱ्या दिवसाला होत होत्या. परंतू आता या फेऱ्यांमध्ये वाढ केली जाणार आहे. वाढती गर्दी लक्षात घेता, उत्तर आणि दक्षिण मुंबईला जोडणाऱ्या ॲक्वा लाईनवर या नवीन वर्षापासून मेट्रोच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय एमएमआरसीकडून घेण्यात आला आहे. केव्हापासून मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ होणार आहे, जाणून घेऊया...
News18
News18
advertisement

मुंबई मेट्रो 3 च्या, अ‍ॅक्वा लाईन मार्गिकेवर 5 जानेवारीपासून (सोमवार) अतिरिक्त रेल्वे सेवा सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा एमएमआरसीकडून करण्यात आली आहे. सोमवार ते शुक्रवार आणि शनिवार या सहा दिवसांच्या लोकल फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये, पूर्वी 265 फेऱ्या सुरू होत्या, पण आता 292 मेट्रोच्या फेऱ्या केल्या जाणार आहेत. 265 वरून 292 मेट्रो फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. तर, शनिवारी पूर्वी 209 मेट्रोच्या फेऱ्या सुरू होत्या. आता त्या वाढवून 236 पर्यंत वाढवल्या आहेत. रविवारच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नसून नेहमीप्रमाणे 198 मेट्रोच्या फेऱ्या चालवल्या जाणार आहेत, अशी माहिती एमएमआरसीने दिली.

advertisement

एमएमआरसीने वाढवलेल्या मेट्रोच्या फेऱ्यांप्रमाणेच प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करावे, अशी माहिती एमएमआरसीने दिली. पूर्णपणे भूमिगत मेट्रो लाईन 3 ही पश्चिम उपनगरातील आरे जेव्हीएलआरला वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मार्गे दक्षिण मुंबईतील कफ परेडशी जोडते, ज्यामध्ये प्रमुख व्यावसायिक आणि प्रशासकीय केंद्रे समाविष्ट आहेत. 33.5 किमी लांबीच्या या कॉरिडॉरमध्ये 27 स्थानके आहेत, जी आरे जेव्हीएलआर वगळता सर्व भूमिगत आहेत. पहिली ट्रेन आरे जेव्हीएलआर आणि कफ परेड येथून सकाळी 5:55 वाजता सुटेल आणि शेवटची ट्रेन रात्री 10:30 वाजता सुटते. अधिकृत आकडेवारीनुसार, ऑक्टोबरमध्ये मेट्रो लाईनवर एकूण 38.63 लाख प्रवाशांची संख्या नोंदवली गेली होती, ज्याची एकूण सरासरी 1,41,024 होती.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
संक्रांतीसाठी खरेदी करा वाण,30 रुपयांपासून मिळतायत पर्याय, पुण्यात हे मार्केट
सर्व पहा

दरम्यान, मुंबई मेट्रो 3 चे टप्प्याटप्प्याने उद्घाटन झाले. आरे ते वांद्रे- कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) ला जोडणारा पहिला टप्पा 2024 मध्ये उद्घाटन करण्यात आले होते, तर मे 2025 मध्ये, बीकेसी ते आचार्य अत्रे चौक (वरळी) पर्यंत सेवा विस्तारणारा टप्पा २अ, जनतेसाठी खुला करण्यात आला. आचार्य अत्रे चौक ते कफ परेड पर्यंत मेट्रो लाईन 3 चा शेवटचा टप्पा 8 ऑक्टोबर 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, पण ही मेट्रो 9 ऑक्टोबर 2025 पासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Metro 3: ॲक्वा लाईनवर मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ, केव्हापासून सुरू होणार अतिरिक्त सेवा? वाचा संपूर्ण वेळापत्रक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल