TRENDING:

मकर संक्रांतीसाठी खरेदी करा वाण, फक्त 30 रुपयांपासून मिळतायत अनेक पर्याय, पुण्यात हे आहे मार्केट

Last Updated:

मकर संक्रांतीला वाण देण्याची परंपरा आपल्याकडे अनेक वर्षांपासूनची आहे. या सणानिमित्त पुण्यातील बाजारपेठांमध्ये देखील खरेदीसाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : नवीन वर्ष सुरू झालं की वर्षातील पहिला येणारा सण म्हणजे मकर संक्रांत. मकर संक्रांतीला वाण देण्याची परंपरा आपल्याकडे अनेक वर्षांपासूनची आहे. या सणानिमित्त पुण्यातील बाजारपेठांमध्ये देखील खरेदीसाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. सध्या मार्केटमध्ये फक्त 30 रुपयांपासून वाण उपलब्ध झाले आहेत. यामध्ये विविध रंगांमध्ये आणि वेगवेगळ्या डिझाइनमधील वस्तू कमी किमतीत मिळत असल्यामुळे महिला वर्गाकडून आनंद व्यक्त केला जात आहे. कमी किमतीत घर उपयोगी वस्तू मिळत असल्यामुळे बाजारपेठांमध्ये महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे.
advertisement

30 रुपयांपासून वाण देण्यासाठी वस्तू उपलब्ध

संक्रांती आली की हळदी-कुंकू कार्यक्रमासाठी वाण काय द्यायचं, हा प्रश्न हमखास पडतो. वाण वेगळं असावं, पण उपयोगीही असावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते. यावर्षी महिलांसाठी वाणाचे चांगले पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. पोटल्या, छोट्या बॅगा, बँगल ठेवण्याचे पाऊच, ज्वेलरी बॉक्स, पर्स अशा अनेक वस्तू अवघ्या 30 रुपयांपासून मिळत आहेत. त्यामुळे 30 ते 50 रुपयांच्या बजेटमध्ये वाण शोधणाऱ्यांसाठी हे पर्याय सोयीचे ठरत आहेत. पुण्यातील रविवार पेठेतील आनंद मॉल परिसरात, सोमेश्वर मंदिराजवळ या वस्तूंची खरेदी करण्यासाठी महिलांची चांगलीच गर्दी पाहायला मिळत आहे.

advertisement

चुकीचा स्पर्श केला तर बसेल 200 व्होल्टचा विजेचा धक्का ,17 वर्षीय मुलीने बनवला वूमन सेफ्टी शूज!

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
संक्रांतीसाठी खरेदी करा वाण,30 रुपयांपासून मिळतायत पर्याय, पुण्यात हे मार्केट
सर्व पहा

यावर्षी विविध वस्तूंवर मोठ्या प्रमाणात ऑफर्स आणि आकर्षक डिस्काउंट देण्यात आले आहेत. फक्त 30 रुपयांपासून सुरू होणाऱ्या किमतीत पोटल्या, बॅग, पर्स, बँगल पाऊच, ज्वेलरी बॉक्स असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यामुळे वाण देण्यासाठी महिलांसमोर कमी किमतीत अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
मकर संक्रांतीसाठी खरेदी करा वाण, फक्त 30 रुपयांपासून मिळतायत अनेक पर्याय, पुण्यात हे आहे मार्केट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल