चुकीचा स्पर्श केला तर बसेल 200 व्होल्टचा विजेचा धक्का ,17 वर्षीय मुलीने बनवला वूमन सेफ्टी शूज!
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
17 वर्षीय दोन मुलींनी वूमन सेफ्टी शूज बनवले आहे. आरती पाटील आणि स्नेहा राठोड या दोन तरुणींनी हे शूज बनवले आहे.
सोलापूर : महिलांवर दिवसेंदिवस वाढत असलेल्या अत्याचारांच्या घटना लक्षात घेऊन सोलापूर शहरातील संगमेश्वर कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या 17 वर्षीय दोन मुलींनी वूमन सेफ्टी शूज बनवले आहे. आरती पाटील आणि स्नेहा राठोड या दोन तरुणींनी हे शूज बनवले आहे. शूज परिधान करणाऱ्या महिलेला व्यक्तीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर त्याला विजेचा जोरदार धक्का बसतो आणि जवळपास चार तास बेशुद्ध होतो. या संदर्भात अधिक माहिती आरती पाटील यांनी लोकल 18 शी बोलताना दिली आहे.
आरती पाटील आणि स्नेहा राठोड संगमेश्वर कॉलेजमध्ये शिक्षण घेत असून या दोन्ही तरुणींनी वूमन सेफ्टी शूज बनवला आहे. हा शूज बनवण्यासाठी शूज, हाय व्होल्टेज जनरेटर, बॅटरी आणि स्विचचा वापर करण्यात आला आहे. लहान मुली आणि तरुणी यांच्यावर होणाऱ्या अत्याचार, वैयक्तिक सुरक्षितता ओळखून या दोन्ही तरुणींनी एक असा उपाय तयार केला आहे असून खरंच महिलांना संरक्षण देऊ शकतो.
advertisement
वूमन सेफ्टी शूज एका सर्किटमध्ये जोडलेले असून शूज नसणाऱ्या महिलेला कोणतीही इजा यापासून होत नाही. ज्यावेळेस एखादी व्यक्ती त्या मुलीला किंवा महिलेला स्पर्श केल्यास त्या व्यक्तीस 200 व्होल्टेजचा शॉक बसणार आहे. या शॉकमुळे किमान तीन ते चार तास तो व्यक्ती बेशुद्ध होतो. ज्यामुळे महिलेला धोकादायक परिस्थितीतून बाहेर पडण्याची संधी मिळते. तर हा वूमन सेफ्टी शूज बनवण्यासाठी फक्त 250 रुपयांपर्यंतचा खर्च आला आहे.
advertisement
आरती पाटील आणि स्नेहा राठोड या दोन्ही तरुणीने बनवलेले वूमन सेफ्टी शूज मुलींना आणि महिलांना परवडणारे आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून आरती आणि स्नेहाने बनवलेला हा शूज महिलांच्या सुरक्षेतेतील एक आशादायक प्रगती आहे जे हल्लेखोरांना रोखते आणि आपत्कालीन स्थितीत मदत सुनिश्चित करता येते. हे सेफ्टी शूज महिलांसाठी सुरक्षा प्रदान करणारे वचनबद्धतेचे प्रतीक आहे.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
Jan 03, 2026 6:36 PM IST
मराठी बातम्या/सोलापूर/
चुकीचा स्पर्श केला तर बसेल 200 व्होल्टचा विजेचा धक्का ,17 वर्षीय मुलीने बनवला वूमन सेफ्टी शूज!








