Success Story : नोकरीसोबत पार्टटाइम फूड व्यवसाय, 2 मित्रांची जोडी ठरली हिट, महिन्याला एवढी कमाई

Last Updated:

. लालबाग परिसरातील दर्शन चव्हाण आणि अथर्व वरे या दोन्ही मित्रांनी नोकरी करत असतानाच पार्टटाइम फूड व्यवसाय सुरू करून हे स्वप्न प्रत्यक्षात साकारले आहे.

+
News18

News18

मुंबई : आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ नोकरीवर अवलंबून न राहता स्वतःचा व्यवसाय उभा करण्याचे स्वप्न अनेक तरुण पाहत असतात. लालबाग परिसरातील दर्शन चव्हाण आणि अथर्व वरे या दोन्ही मित्रांनी नोकरी करत असतानाच पार्टटाइम फूड व्यवसाय सुरू करून हे स्वप्न प्रत्यक्षात साकारले आहे. त्यांच्या या धाडसी निर्णयामुळे ते आज अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत आहेत.
दर्शन आणि अथर्व यांनी आपल्या फूड कार्टवर दिल्लीतील प्रसिद्ध सोया चाप हा खास पदार्थ सर्व्ह करण्यास सुरुवात केली. व्हेजिटेरियन खाद्यप्रकारांमध्ये नेहमीच पनीर किंवा भाज्यांपुरतेच पर्याय मर्यादित असतात ही समस्या त्यांनी ओळखली. याच विचारातून काहीतरी वेगळे आणि चवदार देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यासाठी त्यांनी नॉर्थ इंडियातील विशेषतः दिल्लीतील विविध ठिकाणी भेटी देऊन सखोल रिसर्च केला. तेथे मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय असलेला सोया चाप हा पदार्थ त्यांनी मुंबईच्या बाजारात आणला.
advertisement
चव, गुणवत्ता आणि परवडणारे दर यामुळे त्यांच्या फूड कार्टला अल्पावधीतच ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद मिळू लागला. दिवसभर नोकरी केल्यानंतर संध्याकाळच्या वेळेत फूड कार्ट सांभाळतात. मेहनत, सातत्य आणि योग्य नियोजन यामुळे आज या व्यवसायातून ते दरमहा सुमारे 35 ते 40 हजार रुपयांचे उत्पन्न कमावत आहेत.
advertisement
या प्रवासात अनेक अडचणीही आल्या. शेफ आणि कामगार शोधणे, वीजपुरवठ्याची समस्या तसेच कार्ट लावण्यासाठी योग्य जागा मिळवणे या अडथळ्यांना त्यांनी धैर्याने सामोरे जाऊन मार्ग काढला. आज त्यांच्या व्यवसायात चार जणांना रोजगार मिळाला असून त्यांनी स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीलाही हातभार लावला आहे.
दर्शन सांगतो, बिझनेसच्या दृष्टीने फूड इंडस्ट्री ही खूप चांगली संधी आहे. जर तुमच्याकडे पॅशन, चिकाटी आणि फूडबद्दल खरा इंटरेस्ट असेल तर नक्कीच या क्षेत्रात उतरावे. भविष्यात व्यवसाय आणखी वाढवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला असून लालबागमधील हा फूड कार्ट यशस्वी उद्योजकतेचे उत्तम उदाहरण ठरत आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Success Story : नोकरीसोबत पार्टटाइम फूड व्यवसाय, 2 मित्रांची जोडी ठरली हिट, महिन्याला एवढी कमाई
Next Article
advertisement
Pune: भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा, सीसीटीव्ही फुटेज समोर
भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा
  • बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात मारहाणीचा प्रका

  • शिंदे गटाचे पुणे उत्तर जिल्हाप्रमुख देवदास दरेकर यांनी पुजाऱ्याला मारहाण केली.

  • कोणतीही पोलीस तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement