advertisement

Health Tips : हिवाळ्यात दमा आणि श्वसनविकाराचे रुग्ण का वाढतात? काय काळजी घ्यावी? डॉक्टरांचा सल्ला

Last Updated:

हिवाळा सुरू होताच सर्दी, खोकला, दमा, ब्राँकायटिस यांसारख्या श्वसनविकारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढतात. विशेषतः वृद्ध, लहान मुले तसेच आधीपासून दमा किंवा फुप्फुसांचे आजार असलेल्या रुग्णांसाठी हा काळ अधिक धोकादायक ठरतो.

+
Winter

Winter Health Tips 

अमरावती : हिवाळा सुरू होताच सर्दी, खोकला, दमा, ब्राँकायटिस यांसारख्या श्वसनविकारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढतात. विशेषतः वृद्ध, लहान मुले तसेच आधीपासून दमा किंवा फुप्फुसांचे आजार असलेल्या रुग्णांसाठी हा काळ अधिक धोकादायक ठरतो. तापमानातील घसरण, कोरडी हवा आणि वाढलेले प्रदूषण यामुळे श्वसनसंस्थेवर विपरीत परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येते. हिवाळ्यात हा त्रास कमी व्हावा यासाठी काय काळजी घ्यावी? त्याबाबत माहिती डॉ. धीरज आंडे यांनी दिली आहे.
हिवाळ्यात दमा आणि श्वसनविकार का वाढतात?
याबाबत माहिती देताना डॉ. आंडे सांगतात की, हिवाळ्यातील थंड आणि कोरड्या हवेमुळे श्वसननलिका आकुंचन पावतात. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. थंडीमुळे नाक आणि घशातील ओलावा कमी होतो. त्यामुळे विषाणू आणि जंतुसंसर्ग पटकन होतो. यासोबतच धुके, धूर, धूळकण आणि प्रदूषण यांचे प्रमाण वाढल्याने देखील दम्याचे रुग्ण वाढताना दिसून येत आहेत.
advertisement
काय काळजी घ्यावी?
सर्वात महत्त्वाचं म्हणजे थंडीपासून बचावासाठी शरीर पूर्णपणे झाकलेले ठेवणे आवश्यक आहे. थंड हवा थेट श्वसनात जाणार नाही याची काळजी घ्यावी. बाहेर जाताना मास्क, मफलर किंवा रुमालाचा वापर करावा. डॉक्टरांनी दिलेली इनहेलर किंवा औषधे नियमित घ्यावीत आणि औषधांकडे दुर्लक्ष करू नये. धूम्रपान पूर्णपणे टाळावे. घरातील धूर टाळण्यासाठी स्वच्छता राखावी. सकाळी लवकर धुक्यात फिरणे टाळावे.
advertisement
आहार कसा असावा?
आजारी व्यक्तींनी हिवाळ्यात उष्णता देणारा आणि प्रतिकारशक्ती वाढवणारा आहार घेणे गरजेचे आहे. आल्याचा काढा, तुळशीचा काढा, हळद-दूध, गरम सूप यांचा आहारात समावेश करावा. लसूण, मिरी, हळद यांसारखे नैसर्गिक घटक श्वसनविकारांवर फायदेशीर ठरतात. कोमट पाणी प्यावे. थंड पदार्थ, आइस्क्रीम, फ्रीजमधील अन्न, कोल्ड ड्रिंक्स टाळावेत. तसेच संतुलित आहार घेतल्यास त्रास कमी होण्यास मदत होईल. श्वास घेण्यास त्रास, सतत खोकला, छातीत जडपणा जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. दुर्लक्ष केल्यास आजार गंभीर होऊ शकतो, अशी माहिती डॉ. आंडे यांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips : हिवाळ्यात दमा आणि श्वसनविकाराचे रुग्ण का वाढतात? काय काळजी घ्यावी? डॉक्टरांचा सल्ला
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement