अंड्याचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळलात? मग एकदा 'घोटाळा' करा, रेसिपी अशी की रोज बनवाल, Video

Last Updated:

Egg Recipe: अनेकांना अंड्यांपासून नेहमीचे बनणारे पदार्थ खाण्याचा कंटाळा येतो. त्यामुळे आपण अंडा घोटाळा रेसिपी पाहुयात.

+
Egg

Egg Recipe: नेहमी बनणारे अंड्याचे पदार्थ खाऊन कंटाळात? तर ट्राय करा सुरत स्पेशल अंडा घोटाळा!

पुणे: हिवाळ्यामध्ये उष्ण पदार्थ खाणं शरीरासाठी उत्तम मानलं जातं. त्यामुळे या दिवसामध्ये अंड्याचं सेवन आरोग्यासाठी फायदेशीर आहे. अंड्यापासून आपल्याला प्रथिने, खनिज आणि जीवनसत्त्व मिळतात. परंतु, अनेकांना अंड्यांपासून नेहमीचे बनणारे पदार्थ खाण्याचा कंटाळा येतो. त्यामुळे आज आपण अंड्यांपासून सुरत स्पेशल आणि हटके रेसिपी बनवणार आहोत. ते म्हणजे अंडा घोटाळा ही रेसिपी होय. पुण्यातील वसुंधरा पाटुकले यांनी ही हटके रेसिपी सांगितली आहे.
अंडा घोटाळा बनवण्यासाठी लागणारं साहित्य
अंडी, तेल, टेबल बटर, जिरे, कांदे, टोमॅटो, आलं, लसूण, हिरवी मिरची, लाल मिरची पावडर, काळी मिरी पूड, हळद, गरम मसाला, कोथिंबीर, मीठ आदी साहित्य लागेल.
अंडा घोटाळा बनवण्याची कृती
सुरुवातीला अंडी उकडून त्यांची साल काढून बारीक किसून घ्यावीत. कढई गरम करून त्यात 2 टेबलस्पून तेल व 2 टेबलस्पून बटर घालावे. बटर वितळल्यानंतर जिरे घालून तडतडू द्यावेत. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची व आलं-लसूण पेस्ट घालून कांदा गुलाबी होईपर्यंत परतावा. पुढे बारीक चिरलेला टोमॅटो घालून २–३ मिनिटे परतून घ्यावा. हळद, गरम मसाला व काळी मिरी पावडर घालून मिक्स करावे व मसाला जळू नये म्हणून थोडेसे पाणी घालावे. आता किसलेली उकडलेली अंडी, मीठ व कोथिंबीर घालून चांगले मिक्स करून मंद आचेवर शिजू द्यावे.
advertisement
दुसरीकडे पॅनमध्ये तेल गरम करून 1 अंडे थेट फोडून त्यावर मीठ, लाल मिरची पावडर व कोथिंबीर पसरवत एका बाजूने हाफ फ्राय करून घ्यावे. हे तयार अंडा हाफ फ्राय त्या मसाल्यात घालून मिक्स करावे. मिश्रण घट्ट वाटल्यास आवश्यकतेनुसार थोडे पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करावी व 5 मिनिटे मंद आचेवर शिजू द्यावे. अशा पद्धतीने सुरत स्पेशल स्ट्रीट स्टाईल अंडा घोटाळा तयार होतो. तयार अंडा घोटाळा प्लेटमध्ये काढून वरून कोथिंबीर पसरवून त्यावर पुन्हा एक अंडा हाफ फ्राय ठेवून गरमागरम पावसोबत खाऊ शकता.
view comments
मराठी बातम्या/रेसिपी/
अंड्याचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळलात? मग एकदा 'घोटाळा' करा, रेसिपी अशी की रोज बनवाल, Video
Next Article
advertisement
Pune: भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा, सीसीटीव्ही फुटेज समोर
भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा
  • बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात मारहाणीचा प्रका

  • शिंदे गटाचे पुणे उत्तर जिल्हाप्रमुख देवदास दरेकर यांनी पुजाऱ्याला मारहाण केली.

  • कोणतीही पोलीस तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement