TRENDING:

MHADA : मुंबईत 'या' मोक्याच्या लोकेशनवर गाळा मालक होण्याची सुवर्णसंधी; नोंदणी अन् निकाल कधी? वाचा सविस्तर

Last Updated:

MHADA Auctions : मुंबईतील म्हाडाची अनेक दुकाने ई-लिलावात विक्रीसाठी येत आहेत. चला तर जाणून घ्या या संबंधित सर्व प्रक्रिया कशी असेल?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुंबई शहरात स्वता:चे घर असावे असं सर्वांच स्वप्न असतं. मात्र यासोबत लहान-मोठा गाळाही असावा असं बऱ्याचजणांना वाटेत. भविष्यात जाणून व्यवसाय सुरु करण्यासाठी हे फायद्याचे ठरु शकते. यासाठी म्हाडाने सर्वांसाठी एक सुवर्णसंधी आणली आहे, ज्यात म्हाडाच्या मुंबईतील 84 दुकानांचा मोठा ई-लिलाव होणार आहे
News18
News18
advertisement

म्हाडाच्या या लिलावात मुंबई शहराच्या विविध भागातील दुकानांचा समावेश असणार आहे. ज्यात किंमती 28 लाखांपासून ते 10 कोटींपर्यंत आहेत. महत्त्वा ई-लिलावात भाग घेण्यासाठी इच्छुक व्यक्तींनी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.

सविस्तर माहिती इथं पाहा

ई-लिलावाकरिता ऑनलाईन नोंदणी ही 27 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होणार असून, अर्ज, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक ठरणार आहे. तसेच यासाठी अनामत रक्कम ऑनलाईन भरणे राहिल आणि ही प्रक्रिया 21 डिसेंबर रात्री 11.59 वाजेपर्यंत पूर्ण करावी लागणार आहे. ई-लिलाव 23 डिसेंबरला 'https://eauction.mhada.gov.in' या अधिकृत संकेतस्थळावर होईल आणि निकाल 24 डिसेंबरला जाहीर केला जाणार आहे.

advertisement

मुंबईतील लिलावात दुकानांचे ठराविक प्रमाण भागांनिहाय वितरित करण्यात आले आहे. मुलुंड गव्हाणपाडात 4, कुर्ला-स्वदेशी मिलमध्ये 5, कोपरी-पवईमध्ये 15, मॉडेल टाऊन मजासवाडी आणि गोरेगाव पश्चिम सिद्धार्थ नगरमध्ये प्रत्येकी 1, गोरेगाव पूर्व बिंबिसार नगरमध्ये 17, मालवणी-मालाडमध्ये 29 आणि चारकोपमध्ये 12 दुकाने लिलावात समाविष्ट आहेत.

या लिलावाच्या माध्यमातून नागरिकांना व्यवसायासाठी आणि गुंतवणुकीसाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे. ऑनलाईन ई-लिलावमुळे पारदर्शकता आणि सोय यावर भर दिला जात आहे. इच्छुक खरेदीदारांनी लिलाव प्रक्रियेसाठी सर्व कागदपत्रे वेळेत तयार ठेवणे आणि अनामत रक्कम ऑनलाईन भरल्याशिवाय सहभाग घेता येणार नाही.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मका दराची घसरगुंडी कायम, सोयाबीन आणि कांद्याला आज काय मिळाला भाव?
सर्व पहा

ही संधी मुख्यत्वे व्यवसायिकांसाठी असून मुंबईतील विविध भागांमध्ये दुकान घेऊन व्यवसाय सुरू करणे किंवा गुंतवणूक करणे हा हेतू असलेल्यांसाठी हा लिलाव महत्त्वाचा ठरणार आहे. भविष्यात या दुकानांची किंमत वाढण्याची शक्यता लक्षात घेतली तर हा लिलाव गुंतवणूकदारांसाठी आकर्षक संधी ठरू शकतो.

मराठी बातम्या/मुंबई/
MHADA : मुंबईत 'या' मोक्याच्या लोकेशनवर गाळा मालक होण्याची सुवर्णसंधी; नोंदणी अन् निकाल कधी? वाचा सविस्तर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल