TRENDING:

हसिना माहिमकर, आरीफ शेख यांना लॉटरी, मनसेची संपूर्ण यादी जाहीर; मुंबईत कडवी टक्कर देण्यासाठी 53 शिलेदार

Last Updated:

मनसेने अत्यंत सावध पवित्रा घेत 53 जागांवर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून संपूर्ण शिलेदारांची यादी जाहीर केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : राज्यात महापालिका निवडणुका तोंडावर येऊन ठेपली आहे. आज निवडणूक अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली कंबर कसली आहे. मनसेने अत्यंत सावध पवित्रा घेत 53 जागांवर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मनसेकडून जोरदार मोर्चेबांधणी केली.  मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल 37 उमेदवारांची पहिली अधिकृत यादी जाहीर केली,  मात्र उर्वरित नावांबाबत कमालीची गुप्तता पाळली जात होती. विरोधी पक्षांकडून होणारी फोडाफोडी आणि अंतर्गत बंडाळी टाळण्यासाठी राज ठाकरे सावध भूमिका घेत अखेर मनसे मुंबईची यादी जाहीर केली आहे.
News18
News18
advertisement

मनसे मुंबईची यादी जाहीर 

क्रमांक वॉर्ड क्रमांक उमेदवाराचे नाव
1 8 कस्तुरी रोहेकर
2 10 विजय कृष्णा पाटील
3 11 कविता बागुल माने
4 14 पुजा कुणाल माईणकर
5 18 सदिच्छा मोरे
6 20 दिनेश साळवी
7 21 सोनाली देव मिश्रा
8 23 किरण अशोक जाधव
9 27 आशा विष्णू चांदर
10 36 प्रशांत महाडीक
11 38 सुरेखा परब लोके
12 46 स्नेहिता संदेश डेहलीकर
13 55 शैलेंद्र मोरे
14 58 वीरेंद्र जाधव
15 67 कुशल सुरेश धुरी
16 68 संदेश देसाई
17 74 विद्या भरत आर्य
18 81 शबनम शेख
19 84 रूपाली दळवी
20 85 चेतन बेलकर
21 98 दिप्ती काते
22 102 अनंत हजारे
23 103 दिप्ती राजेश पांचाळ
24 106 सत्यवान दळवी
25 110 हरीनाक्षी मोहन चिराथ
26 115 ज्योती अनिल राजभोज
27 119 विश्वजीत शंकर ढोलम
28 128 सई सनी शिर्के
29 129 विजया गिते
30 133 भाग्यश्री अविनाश जाधव
31 139 शिरोमणी येशू जगली
32 143 प्रांजल राणे
33 146 राजेश पुरभे
34 149 अविनाश मयेकर
35 150 सविता माऊली थोरवे
36 152 सुधांशू दुनबळे
37 166 राजन मधुकर खैरनार
38 175 अर्चना दिपक कासले
39 177 हेमाली परेश भनसाली
40 178 बजरंग देशमुख
41 183 पारूबाई कटके
42 188 आरिफ शेख
43 192 यशवंत किल्लेदार
44 197 रचना साळवी
45 205 सुप्रिया दळवी
46 207 शलाका हरियाण
47 209 हसीना महिमकर
48 212 श्रावणी हळदणकर
49 214 मुकेश भालेराव
50 216 राजश्री नागरे
51 217 निलेश शिरधनकर
52 223 प्रशांत गांधी
53 226 बबन महाडीक

advertisement

मुंबई महापालिकेसाठी मनसेच्या उमेदवारांची यादी जाहीर झाल्याने पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईतील स्थानिक प्रश्न, मराठी माणसांचे मुद्दे आणि महापालिकेतील प्रशासनावर नियंत्रण या मुद्द्यांवर मनसे निवडणुकीत आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे. आगामी पालिकेत  मनसे कोणती रणनीती अवलंबणार, याकडे मुंबईसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मनसेने मुंबई महानगरपालिकेसाठी  उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी युती केली आहे.

advertisement

हे ही वाचा :

Nagpur Congress List: नागपूरसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर; RSS बालेकिल्ल्यात कोण लढणार?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महिलांनी दारू पिणं चांगलं की वाईट? पुरुषाच्या तुलनेत शरिरावर कसा होतो परिणाम?
सर्व पहा

जुळता जुळता फाटलं! राज्यात 29 पैकी 15 जागी युती फिस्कटली, भाजप- शिंदेंमध्ये कुठे कुठे झाली फाटाफूट?

मराठी बातम्या/मुंबई/
हसिना माहिमकर, आरीफ शेख यांना लॉटरी, मनसेची संपूर्ण यादी जाहीर; मुंबईत कडवी टक्कर देण्यासाठी 53 शिलेदार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल