TRENDING:

BMC: 'त्या' 11 लाख मुंबईकरांच्या घरी पथक धडकणार, महानगरपालिकेचं मोठं पाऊल; नेमकं कारण काय?

Last Updated:

मुंबई महानगपालिका अॅक्शन मोडमध्ये आली असून आता दुबार मतदारांना पालिका थेट नोटीस पाठवणार आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुंबई महापालिकेनं जाहीर केलेल्या प्रारुप मतदारयादीत तब्बल 11 लाख दुबार नावं असल्याची धक्कादायक माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे एकाच व्यक्तीचं नाव दोनदा-तीनदा नव्हे, तर 103 वेळा मतदारयादीत असल्याची माहिती देखील मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे. तर 4 लाख 33 हजार मतदारांची नावं एकापेक्षा जास्त वेळा असल्याचंही समोर आलं. या मतदारयादीवरून वातावरण तापले होते. मतदार याद्या दुरस्त केल्याशिवाय निवडणुका नको, अशी मागणी विरोधकांनी केली. त्यानंतर आता मुंबई महानगपालिका अॅक्शन मोडमध्ये आली असून आता दुबार मतदारांना पालिका थेट नोटीस पाठवणार आहेत.
मुंबई महापालिका
मुंबई महापालिका
advertisement

मुंबईत एकूण एक कोटी तीन लाख मतदार आहेत. त्यापैकी 11 लाख म्हणजे जवळपास 10 टक्के नाव दुबार आहेत. दुबार मतदारांची नावं हटवावीत अशी मागणी करत ठाकरे बंधूंनी सोमवारीच निवडणूक आयोगाला पत्र दिलं होतं. त्यानंतर मुंबई महापालिकेने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दुबार मतदारांना मुंबई महापालिकेकडून नोटीस दिली जाणार आहे. मुंबईतील दुबार मतदारांवर आता मुंबई महानगर पालिकेची देखील करडी नजर असणार आहे.

advertisement

महानगपालिकेचे आदेश 

मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त घरोघर जाऊन सर्वेक्षण करणार आहे. 11 लाखहून अधिक दुबार मतदारांच्या नोंदी तपासणार आहे. दुबार मतदारांना नोटीस देऊन मतदार यादीतून नाव वगळण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे महानगर पालिकेला दिले आहेत.

मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणींनी विशेष मोहिमेकरता मुंबईतील वॉर्ड ऑफिसरची बैठक होणार असून या बैठकीत आदेश दिले जाणार आहे.

advertisement

मतदानाच्या दिवशी देणार हमीपत्र

मतदार यादीत ज्यांचे एकपेक्षा अधिक वेळा नाव आले त्यांना नोटीस देऊन त्यांच्याकडून परिशिष्ट 1 भरुन घेतले जाणार आहे. संबंधित मतदार मतदान कोणत्या केंद्रावर हे देखील निश्चित केले जाणार आहे. तसेच, मतदानाच्या दिवशी हमीपत्रही घेतले जाणार आहे.

निवडणूक आयोगासमोर मोठं आव्हान

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कॅन्सरने मुलगा गेला, विजय बनले अनाथांचे नाथ; 150 मुलांना घडवलं, प्रवास सुरूच!
सर्व पहा

बईत सर्वाधिक दुबार मतदार आदित्य ठाकरेंच्या वरळी विभागात आढळले आहेत. सरासरीनुसार वरळी विधानसभेत 6800 हून अधिक दुबार मतदार आहेत.माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या प्रभाग क्रमांक 199 मध्ये सर्वाधिक 8207 दुबार मतदारांची संख्या आहे. धक्कादायक म्हणजे खुद्द पेडणेकर यांचंच नाव यादीत दोनदा आढळलं आहे. माजी महापौर स्नेहल आंबेकरांच्या प्रभाग क्रमांक 198 मध्ये 7 हजार 295 दुबार मतदार आहेत. ठाकरे सेनेच्या आशिष चेंबुरकरांच्या प्रभाग क्रमांक 196 मध्ये 7095 दुबार मतदार आहेत. तर शिंदे गटाचे माजी नगररसेवक असलेल्या समाधान सरवणकरांच्या प्रभाग क्र.194 मध्ये 7584 इतके दुबार मतदार आढळलेत. सर्वाधिक 14 प्रभाग असलेल्या भांडुप विभागात तर तब्बल 69 हजार 500 दुबार मतदार आढळलेत. मात्र मतदार यादीतील लाखोंच्या संख्येतील दुबार नावं शोधणं आणि ती मतदार यादी बाहेर काढणं हे मोठं आव्हान निवडणूक आयोगासमोर उभं राहिलं आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
BMC: 'त्या' 11 लाख मुंबईकरांच्या घरी पथक धडकणार, महानगरपालिकेचं मोठं पाऊल; नेमकं कारण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल