खरं तर वरळी नाका, गणपतराव कदम मार्गावरील ‘सूरज वल्लभदास चाळ’ परिसरात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचा काळाबाजार सूरू होता. विेशेष म्हणजे सिलिंडर बेकायदेशीररीत्या रिफिलिंग करून काळ्या बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. रहिवासी भागात धोकादायक पद्धतीने सिलिंडर साठवून काळ्या बाजारात विक्री सुरू असल्याची माहिती समोर आली होती. या घटनेची माहिती मिळताच शिधावाटप विभागाने धडक कारवाई केली आहे. नियंत्रक शिधावाटप चंद्रकांत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली फिरत्या पथकासह कार्यालय क्रमांक 21 च्या अधिकाऱ्यांची संयुक्त कारवाई करत ‘सूरज वल्लभदास चाळीवर’ धाड टाकली होती.
advertisement
शिधावाटप विभागाच्या धडक कारवाईत मोठ्या प्रमाणात सिलिंडर जप्त करण्यात आले होत. यावळी एचपी गॅस कंपनीचे 5 किलोचे 6 भरलेले आणि 58 रिकामे सिलिंडर जप्त करण्यात आले.
त्यासोबत सुपर गॅस कंपनीचे 4 किलोचे 64 भरलेले आणि 12 किलोचे 19 भरलेले सिलिंडर जप्त केले. तर 12,4 आणि 2 किलोचे विविध आकाराचे 25 रिकामे सिलिंडरही ताब्यात घेतले गेले.
तसेच जप्त केलेला सर्व मुद्देमाल पुढील फौजदारी कारवाईसाठी वरळी पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आला आहे.रहिवासी भागात अशा प्रकारे सिलिंडर साठवणे अत्यंत धोकादायक असल्याचे प्रशासनाचे सांगितले आहे. गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
