TRENDING:

वारंवार लघवीला जाते म्हणून 75 वर्षीय माऊलीला बेडला बांधून मारहाण, केअर टेकरकडून वृद्ध महिलेचा अमानुष छळ

Last Updated:

केवळ मारहाण करून ती थांबली नाही, तर ही बाब कोणाला सांगितली तर आणखी मारहाण करेल अशी धमकीही तिने वृद्ध महिलेला दिली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
संकेत वरक, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

मुंबई :  बोरिवलीतील गोराई परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. ज्या वृद्धाश्रमात आधाराची अपेक्षा होती, तिथेच एका 75 वर्षीय वृद्ध माउलीला अमानुष छळाला सामोरे जावे लागले. वृद्ध महिला आजारपणामुळे वारंवार लघवीला जात असल्याचा राग आल्याने केअर टेकर सुरेखा पवार हिने या आजींना खाटेला बांधून झाडूने बेदम मारहाण केली. या कृत्यामुळे बोरिवली परिसरात संतापाची लाट उसळली असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित केअर टेकरला अटक केली आहे.

advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 11 मार्च रोजी गोराई येथील 'साई सिनियर केअर फाऊंडेशन' या वृद्धाश्रमात घडली. येथील 75 वर्षीय वृद्ध महिला वयोमानानुसार वारंवार लघवीला जात होती. याचा राग केअर टेकर सुरेखा पवार हिला आला. तिने या असहाय्य वृद्धेचे हात बेडला बांधले आणि त्यांना झाडूने बेदम मारहाण केली. केवळ मारहाण करून ती थांबली नाही, तर ही बाब कोणाला सांगितली तर आणखी मारहाण करेल अशी धमकीही तिने वृद्धेला दिली.

advertisement

कसं फुटलं बिंग?

केअर टेकरच्या धमकीमुळे प्रचंड घाबरलेल्या या वृद्ध माउलीने तब्बल २० मार्चपर्यंत कोणाकडेही अवाक्षर काढले नाही. मात्र, वृद्धेच्या शरीरावरील जखमा आणि त्यांची बदललेली वागणूक पाहून ही बाब उघडकीस आली. नातेवाईकांना संशय आल्यानंतर या अमानुष छळाचा पाढा वाचला गेला. त्यानंतर नातेवाईकांनी तातडीने बोरिवली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

advertisement

केअर टेकर सुरेखावर गुन्हा दाखल

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: द्राक्षं, केळीचं मार्केट हाललं; कांदा, लिंबूला शनिवारी किती मिळाला भाव?
सर्व पहा

वृद्धेच्या तक्रारीची गंभीर दखल घेत बोरिवली पोलिसांनी सुरेखा पवार हिच्यावर गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. वृद्धाश्रमातील इतर कर्मचाऱ्यांचीही चौकशी सुरू असून, 'साई सिनियर केअर फाऊंडेशन'च्या व्यवस्थापनावरही कारवाई होण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
वारंवार लघवीला जाते म्हणून 75 वर्षीय माऊलीला बेडला बांधून मारहाण, केअर टेकरकडून वृद्ध महिलेचा अमानुष छळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल