माझ्या लेकीचं वजन होतं 70 किलो, मग...
माझी लेक नांदायला गेल्यापासून अजय गर्जे त्यांच्यात राहत होता. शीतल गर्जे देखील तिथंच होती. या तिघांनी मिळून माझी लेक मारली. माझ्या लेकीचं वजन होतं 70 किलो... ती फॅनला लटकली होती. मग अनंतला एकट्याला तिला कशी उतरवता आली. हे एकट्याच काम नाही, असं गौरीच्या आईने म्हटलं आहे. अनंत गौरीला घेऊन 30 मजले उतरला कसा? आणि खिडकीतून कसा आला? बेडच्या बाजूची खिडकी अशी होती, तिथून माणूस जाऊच शकत नाही. कुठं शिडी लावायला जागा होती? असा सवाल देखील गौरीच्या आईने विचारला आहे.
advertisement
मामी गौरीने फाशी घेतली...
अनंतने गौरीच्या वडीलांना फोन केला आणि म्हटला की गौरीने सुसाईड करायचा प्रयत्न केला. सुसाईड म्हणजे काय केलं नक्की असं विचारल्यावर अनंत म्हणाला की, तिने औषध घेतलं. त्यानंतर अनंतने फोन कट केला. आणि मला रडत फोन करून म्हटला, मामी गौरीने फाशी घेतली. मी पोतदारला आहे आणि माझ्यासमोर गौरीच मड आहे. आम्हाला त्यानं 7 वाजता सांगितलं, असंही गौरीच्या आईने खुलासा केला आहे.
...तर मी वरळी पोलीस चौकीसमोर फाशी घेईल
दरम्यान, आरोपपत्रात उल्लेख असलेल्या अजय गर्जे आणि शितल आंधळे यांना अद्याप अटक करण्यात आली नाही. अजय गर्जे आणि शितल आंधळे दोघंही अजूनही मोकाट आहेत. त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी, अशी मागणी गौरीच्या आईने केली आहे. गौरीला न्याय मिळाला नाही तर मी वरळी पोलीस चौकीसमोर फाशी घेईल. अनंत खरं बोलला तरच त्याला माफी, असंही गौरीच्या आई म्हणाल्या आहेत.
