TRENDING:

Mumbai Water Cut News: मुंबई, ठाणेकरांनो लक्ष द्या; सलग 12 दिवस होणार 20 टक्के पाणी कपात, जाणून घ्या

Last Updated:

ठाणे महानगरपालिका आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांना पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे येथे भातसा नदीवर बांधण्यात आलेल्या बंधार्‍यावर बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या मार्फत भातसा नदीच्या बंधाऱ्यातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी बसविण्यात आलेले न्युटिक गेट सिस्टीमच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: ठाणे महानगरपालिका आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांना पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे येथे भातसा नदीवर बांधण्यात आलेल्या बंधार्‍यावर बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या मार्फत भातसा नदीच्या बंधाऱ्यातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी बसविण्यात आलेले न्युटिक गेट सिस्टीमच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी दिनांक 27.01.2026 ते दि.07.02.2026 या कालावधीत न्युटिक गेट सिस्टीमची दुरुस्तीचे काम करणे करीता नदीच्या पाण्याची पातळी कमी करण्यात आली असून या कालावधीत पिसे येथील उदंचन केंद्रात पाण्याची पातळी खालावली आहे. परिणामी, ठाणे महानगरपालिकेस होणारा पाणी पुरवठा 20% कमी झाला असल्याने ठाणे शहरातील पाणी पुरवठा कमी दाबाने होत आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने पुढील 12 दिवसांसाठी खालीलप्रमाणे पाण्याचे शटडाऊन घेऊन पाणी वितरणाचे नियोजन करण्यात केले आहे.
Mumbai Water Cut News: मुंबई, ठाणेकरांनो लक्ष द्या; सलग 12 दिवस होणार 20 टक्के पाणी कपात, जाणून घ्या
Mumbai Water Cut News: मुंबई, ठाणेकरांनो लक्ष द्या; सलग 12 दिवस होणार 20 टक्के पाणी कपात, जाणून घ्या
advertisement

बुधवार दिनांक 28.01.2026 रोजी गांधीनगर, सुभाषनगर, नळपाडा, वसंत विहार, लोकपुरम, लोकउपवन, एम. एम. आर. डी. ए. तुळसीधाम, वागळे MIDC, चिराग नगर, वर्तकनगर परिसर, समतानगर, वर्तकनगर, भिम नगर परिसर, ज्ञानेश्वर नगर, महात्मा फुले नगर, गंगाधर नगर, वैतीवाडी परिसरातील पाणी पुरवठा सकाळी 09:00 वाजल्यापासून ते दिनांक 29.01.2026 रोजी सकाळी 09:00 वाजेपर्यंत 24 तास बंद राहणार आहे. गुरूवार दिनांक 29.01.2026 रोजी दत्तवाडी, बॉम्बे कॉलनी, जीवन बाग, मुंब्रा देवी, शैलेश नगर, उदय नगर, रेती बंदर, सम्राट नगर, नारायण नगर, मेक कंपनी जल कुंभ ते शंकर मंदिर, संजय नगर परिसर, सिद्धेश्वर, चंदनवाडी, पाटीलवाडी, चरई मावळी मंडळ, कोलबाड, गोकुळनगर, आजाद नगर, खोपट, सिव्हील हॉस्पीटल परिसर, आंबेडकर रोड परिसरातील पाणी पुरवठा सकाळी 09:00 वाजल्यापासून ते दिनांक 30.01.2026 रोजी सकाळी 09:00 वाजेपर्यंत 24 तास बंद राहणार आहे.

advertisement

शुक्रवार 30.01.2026 रोजी शास्त्रीनगर नं 1 आणि 2, लक्ष्मीपार्क, विहंग पार्क, सुरकरपाडा परिसर, सिद्धाचंल, कळवा, मनिषा नगर, खारेगाव, आतकोनेश्वर नगर, भास्कर नगर, पाँड पाडा, रघुकुल, पारसिक नगर परिसरातील पाणी पुरवठा सकाळी 09:00 वाजल्यापासून ते दिनांक 31.01.2026 रोजी सकाळी 09:00 वाजेपर्यंत 24 तास बंद राहणार आहे.

शनिवार दिनांक 31.01.2026 रोजी लोकमान्य नगर पाडा नं 3 आणि 4, इंदिरानगर, सावरकररनगर, साठेनगर, आंबेवाडी, डवलेनगर, रामनगर, कैलासनगर, जुनागाव, किसननगर, भटवाडी, श्रीनगर, शांतीनगर, रुपादेवी पाडा परिसरातील पाणी पुरवठा सकाळी 09:00 वाजल्यापासून ते दिनांक 01.02.2026 रोजी सकाळी 09:00 वाजेपर्यंत 24 तास बंद राहणार आहे.

advertisement

रविवार दिनांक 01.02.2026 रोजी लोकमान्य नगर पाडा नं 1, दोस्ती कॉम्प्लेक्स, वेदांत कॉम्प्लेक्स, कोरस नक्षत्र, रुणवाल कॉम्प्लेक्स परिसर, लोकमान्य नगर पाडा नं 2, शास्त्रीनगर नं 2, अरुण क्रिडा मंडळ, क्रोम पार्क, मोरेवाडी, गोकुळ नगर, आझाद नगर, मसनवाडा, रुतु पार्क परिसर, मनो रुग्णालय परिसर, शिवाजीनगर, रघुनाथ नगर, डिसोजा वाडी, कशिश पार्क, रहेजा गार्डन, ग्रीष्मा सोसायटी, धर्मवीर नगर, परबवाडी, इंटरनिटी कॉम्प्लेक्स, विष्णु नगर, भास्कर कॉलनी, ब्राम्हन सोसायटी, घंटाळी, राम मारुती रोड, साठेवाडी परिसरातील पाणी पुरवठा सकाळी 09:00 वाजल्यापासून ते दिनांक 02.02.2026 रोजी सकाळी 09:00 वाजेपर्यंत 24 तास बंद राहणार आहे.

advertisement

सोमवार दिनांक 02.02.2026 रोजी बाळकुम, राम मारुती नगर, लोढा अमारा, कल्पतरु, ब्रम्हांड, रुतु सिटी, जेलटाकी परिसर, पोलीस लाईन, खारकर अली, जरीमरी, वृंदावन, श्रीरंग, विकास कॉम्पलेक्स, आंबेडकर नगर, क्रांती नगर, साकेत कॉम्पलेक्स, महागिरी, खारटन रोड, सिडको बस स्टॉप परिसर, कोपरी कोळीवाडा, पंचगंगा, राबोडी 1 आणि 2. आकाश गंगा परिसरातील पाणी पुरवठा सकाळी 09:00 वाजल्यापासून ते दिनांक 03.02.2026 रोजी सकाळी 09:00 वाजेपर्यंत 24 तास बंद राहणार आहे.

advertisement

मंगळवार दिनांक 03.02.2026 रोजी माजीवाडा, मानपाडा, कोठारी कंपाऊड, ढोकाळी, मनोरमा नगर, रुनवाल, डोंगरीपाडा, विजयीनगर, विजय पार्क, वाघबीळ, आनंदनगर, कासारवडवली परिसरातील पाणी पुरवठा सकाळी 09:00 वाजल्यापासून ते दिनांक 04.02.2026 रोजी सकाळी 09:00 वाजेपर्यंत 24 तास बंद राहणार आहे.

बुधवार दिनांक 04.02.2026 रोजी गांधीनगर, सुभाषनगर, नळपाडा, वसंत विहार, लोकपुरम, लोकउपवन, एम. एम. आर. डी. ए. तुळसीधाम, वागळे MIDC, चिराग नगर, वर्तकनगर परिसर, समतानगर, वर्तकनगर, भिम नगर परिसर, ज्ञानेश्वर नगर, महात्मा फुले नगर, गंगाधर नगर, वैतीवाडी परिसरातील पाणी पुरवठा सकाळी 09:00 वाजल्यापासून ते दिनांक 05.02.2026 रोजी सकाळी 09:00 वाजेपर्यंत 24 तास बंद राहणार आहे.

गुरुवार दिनांक 05.02.2026 रोजी दत्तवाडी, बॉम्बे कॉलनी, जीवन बाग, मुंब्रा देवी, शैलेश नगर, उदय नगर, रेतीबंदर, सम्राट नगर, नारायण नगर, मेक कंपनी जलकुंभ ते शंकर मंदिर, संजय नगर परिसर, सिद्धेश्वर, चंदनवाडी, पाटीलवाडी, चरई मावळी मंडळ, कोलबाड, गोकुळनगर, आजाद नगर, खोपट, सिव्हील हॉस्पीटल परिसर, आंबेडकर रोड परिसरातील पाणी पुरवठा सकाळी 09:00 वाजल्यापासून ते दिनांक 06.02.2026 रोजी सकाळी 09:00 वाजेपर्यंत 24 तास बंद राहणार आहे.

शुक्रवार दिनांक 06.02.2026 रोजी शास्त्रीनगर नं 1 आणि 2, लक्ष्मीपार्क, विहंग पार्क, सुरकरपाडा परिसर, सिद्धाचंल, कळवा, मनिषा नगर, खारेगाव, आतकोनेश्वर नगर, भास्कर नगर, पौंड पाडा, रघुकुल, पारसिक नगर परिसरातील पाणी पुरवठा सकाळी 09:00 वाजल्यापासून ते दिनांक 07.02.2026 रोजी सकाळी 09:00 वाजेपर्यंत 24 तास बंद राहणार आहे.

शनिवार दिनांक 07.02.2026 रोजी लोकमान्य नगर पाडा नं 1, दोस्ती कॉम्प्लेक्स, वेदांत कॉम्प्लेक्स, कोरस नक्षत्र, रुणवाल कॉम्प्लेक्स परिसर, लोकमान्य नगर पाडा नं 2, शास्त्रीनगर नं 2, अरुण क्रिडा मंडळ, क्रोम पार्क, मोरेवाडी, गोकुळ नगर, आझाद नगर, मसनवाडा, रुतु पार्क परिसर, मनोरुग्णालय परिसर, शिवाजीनगर, रघुनाथ नगर, डिसोजा वाडी, कशिश पार्क, रहेजा गार्डन, ग्रीष्मा सोसायटी, धर्मवीर नगर परिसर, परबवाडी इटरनिटी कॉम्प्लेक्स, विष्णुनगर, भास्कर कॉलनी, ब्राह्मण सोसायटी, घंटाळी, राम मारुती रोड, साठेवाडी परिसरातील पाणी पुरवठा सकाळी 09:00 वाजल्यापासून ते दिनांक 08.02.2026 रोजी सकाळी 09:00 वाजेपर्यंत 24 तास बंद राहणार आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पाचव्या दिवशीच केला विधी पूर्ण, वृक्षारोपणातून मातृस्मृती जपणारे भानुसे कुटुंब ‎
सर्व पहा

वरील कामामुळे पाणी पुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा व महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे…

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Water Cut News: मुंबई, ठाणेकरांनो लक्ष द्या; सलग 12 दिवस होणार 20 टक्के पाणी कपात, जाणून घ्या
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल