नेमके कोणते असतील ते पूल?
1)विद्याविहारमधील उड्डाणपूल 25 जूनपर्यंत वाहतूकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे. हा पूल लाल बहादूर शास्त्री मार्ग तसेच रामकृष्ण चेंबूरकर या मार्गाला जोडणार असल्यामुळे पूर्व आणि पश्चिम वाहतूक सोपी होणार आहे, त्यामुळे प्रवाशांना आणि पादचाऱ्यांना मोठा फायदा होईल.
2) सायन रेल्वे स्थानकाजवळील पूलाचा यात समावेश असून 15 जुलैपर्यंत या पुलाचे काम करण्याचे लक्ष्य आहे. हा पूल सुरु झाल्यास मुंबई शहर आणि उपनगरांना जोडणार असून महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.
advertisement
3) गोरेगाव ते दिंडोशी दरम्यानचा पूल हा पुढच्या महिन्यांच्या शेवटापर्यंत म्हणजे 31 मेपर्यंत सुरु करण्याचा प्रयत्न सुरु आहे. हा पूल गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचा भाग असून वाहतूक कोंडीतून सुटका मिळवण्यासाठी हा पुल फायदेशीर ठरणार आहे.
४) शिवाय महालक्ष्मी येथील केबल स्टेड पूल हा दिवाळीपर्यंत खुला करण्याचा प्रयत्न आहे तर नेहरु तारांगण ते एनी बेझंड रोड जोडणारा पूल सुरु झाल्यास वरळीतील होणारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी कमी होईल. पुढील सहा महिन्यांत एकूण सात पूल सुरू करून मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे
