TRENDING:

Mumbai-Pune: मुंबई ते पुणे फक्त दीड तासात, लवकरच होणार आणखी एक महामार्ग, कुठून कुठंपर्यंत?

Last Updated:

Mumbai-Pune Express Way: मुंबई आणि पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता मुंबई ते पुणे हा प्रवास साडेतीन नव्हे तर फक्त दीड तासात होणार असून लवकरच नवा महामार्ग सेवेत येणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: मुंबई आणि पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता मुंबईहून पुण्याला फक्त दीड तासात पोहोचता येणार आहे. सध्याच्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाला आणखी एक समांतर महामार्ग बांधण्याचा निर्णय भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे. त्यामुळे मुंबई-पुणे तिसरा महामार्ग आता प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे प्रवास अधिक जलद होणार आहे.
Mumbai-Pune: मुंबई ते पुणे फक्त दीड तासात, लकवरच होणार आणखी एक महामार्ग, कुठून कुठंपर्यंत?
Mumbai-Pune: मुंबई ते पुणे फक्त दीड तासात, लकवरच होणार आणखी एक महामार्ग, कुठून कुठंपर्यंत?
advertisement

महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि कर्नाटकातील बंगळुरू या प्रमुख शहरांना जोडणारा 830 किलोमीटरचा द्रुतगती महामार्ग प्रस्तावित आहे. या प्रकल्पांतर्गत मुंबई ते पुणे नवा द्रुतगती महामार्ग बांधला जाणार आहे. अटल सेतू जिथून संपतो तिथूनच हा महामार्ग सुरू होणार आहे. पुढे पुणे वर्तुळाकार मार्गाला जोडून पुणे-बंगळुरू महामार्गाला मिळेल.

Railway: छत्रपती संभाजीनगर-पुणे रेल्वे प्रवास आता 4.30 तासांत, नवीन मार्गाने अंतर आणि वेळेची होणार बचत! 

advertisement

कसा असेल प्रस्तावित मार्ग?

मुंबई-पुणे-बंगळुरू या प्रस्तावित महामार्गातील मुंबई-पुणे महामार्ग अटल सेतू-चौक-पुणे, शिवारे असा असणार आहे. हा मार्ग 130 किलोमीटरचा असेल. तर उर्वरित 100 किमीच्या महामार्गाची तपासणी अभ्यासासह आराखडा तयार करण्याचे काम सुरू करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या नव्या महामार्गामुळे सध्या साडेतीन तास लागणारे मुंबई ते पुणे अंतर केवळ दीड तासांत पूर्ण करता येईल.

advertisement

नवा महामार्ग कशासाठी?

मुंबई ते पुणे पूर्वीच दोन महामार्ग आहेत. तरीही नवा महामार्ग का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. परंतु, वाढवण बंदर, नवी मुंबई विमानतळ आणि तिसरी मुंबई यामुळे भविष्यात मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्या वाहनांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे. त्यामुळेच द्रुतगती महामार्गाला समांतर आणखी एक द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

advertisement

ऑक्टोबरमध्ये मिसिंग लिंक सेवेत

दरम्यान, मुंबई-पुण्याला जोडणारा आणखी एक प्रकल्प लवकरच सेवेत दाखल होत आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेला पर्यायी रस्ता म्हणून मिसिंग लिंक ऑक्टोबरपर्यंत खुला होणार आहे. सध्या या रस्त्याचे काम 94 टक्के पूर्ण झाले आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागातील 13.3 किमीचा हा पर्यायी रस्ता आहे. 2019 मध्ये या प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले होते.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai-Pune: मुंबई ते पुणे फक्त दीड तासात, लवकरच होणार आणखी एक महामार्ग, कुठून कुठंपर्यंत?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल