वडिलांनी टोकलं म्हणून मुलाने टोकाचं पाऊल उचलंल
मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव हैदर कराचीवाला असे असून त्याला दारूचे व्यसन होते. या व्यसनामुळे घरात वारंवार वाद होत होते आणि कुटुंबात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शनिवारी सकाळी हैदरचा त्याच्या कुटुंबीयांशी वाद झाला. वादानंतर तो रागाच्या भरात घराबाहेर पडला.
पहाटे घरी परतला मात्र
advertisement
यानंतर पहाटे चारच्या सुमारास विलेपार्ले पोलिस ठाण्यातून हैदरचे वडील युसूफ कराचीवाला यांना फोन आला. पोलिसांनी हैदर दारूच्या नशेत आढळल्याचे सांगत त्याला घरी घेऊन जाण्यास सांगितले. रविवारी सकाळी सुमारे सहाच्या सुमारास वडील हैदरला घरी घेऊन आले.
घरी आल्यानंतर हैदरच्या पालकांनी त्याच्याशी शांतपणे संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्याला दारू सोडण्याचा सल्ला दिला. यानंतर हैदर आपल्या खोलीत गेला. बराच वेळ झाला तरी तो बाहेर न आल्याने कुटुंबीयांना शंका आली. सकाळी सुमारे 8.15 वाजता हैदरने खोलीतून उडी मारल्याचे लक्षात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे कराचीवाला कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
